Lock Down काळात बॉलिवूड सेलिब्रिटी बनले शेफ; दीपिका पादुकोण, कार्तिक आर्यन सहित 'या' मंडळींनी बनवल्या लज्जतदार रेसिपी (See Photos)
Kartik Aryan, Vicky Kaushal, Malaika Arora (Photo Credits: Instagram)

लॉक डाऊन (Lock Down) काळात सामान्य माणसाप्रमाणेच सेलिब्रिटी मंडळी सुद्धा घरातच अडकून पडली आहेत. घर बसल्या करायचं काय  यावर प्रत्येकाने उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. कोणी पुस्तक वाचून, तर कोणी घरातच व्यायाम करून आपला वेळ घालवत आहे. काहींनी तर चक्क या काळात आपल्या घरात काम करणाऱ्या मंडळींच्या मदतीने घरकामाचे सुद्धा धडे घेतले आहेत. आपण काय करतोय याचे रोजचे अपडेट ही सेलिब्रिटी मंडळी आपल्या फॅन्स सोबत शेअर करत आहेत, यातील सर्वांच्या पोस्ट पाहता सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन दिसते ती म्हणजे कुकिंग. कार्तिक आर्यन (Kartik Aaryan), दीपिका पदुकोण (Deepika Padukone), मलायका अरोरा (Malaika Arora), यांसारख्या मोठमोठ्या स्टार मंडळीनीं घरात खास जेवणाचा बेत केल्याचे आपल्या पोस्ट मध्ये सांगितले आहे. सहसा घरकामाशी संबंध येण्याइतका वेळ नसलेली ही मंडळी आता स्वतःच मास्टरशेफ झाली आहेत असे म्हणता येईल. Lockdown मुळे घरी असलेल्या रितेश देशमुख कडून पत्नी जेनेलिया ने करुन घेतले 'हे' काम, Watch Viral Tik Tok Video

तुमच्या या आवडत्या कलालकरांच्या किचन मध्ये नेमकं शिजतंय काय हे जाणून घ्यायला तुम्हालाही उत्साह असेल ना.. चला तर मग पाहुयात या मंडळींच्या खास रेसिपीज. Sherlyn Chopra ने हॉट अवतारात बनवलेली ही रेसिपी चाखायची आहे का? Watch Photos

दीपिका पादुकोण

दीपिकाने एक अक्खा लज्जतदार फुल कोर्स मेन्यू तयार केला आहे. यामध्ये नॉर्मल भात ते केक पर्यंत सर्व काही तिने बनवून त्याचे फोटो आपल्या इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

Season 1:Episode 8 COOK.EAT.SLEEP.REPEAT. Productivity in the time of COVID-19!😷

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यनने आपल्या बहिणीच्या वाढदिवसासाठी खास घरगुती केक बनवून त्यांच्यासोबतच्या काही सेल्फीज आपल्या फॅन्ससोबत शेअर केल्या आहेत.

मलायका अरोरा

मलायका अरोरा ही साधारणतः हेल्थ आणि फिटनेस फ्रिक म्ह्णून ओळखली जात असली तरी तिने आपल्या किचन मध्ये चक्क अप्पे आणि बेसनाचे लाडू बनवले आहेत.

विकी कौशल

विकी कौशल शुद्ध आपल्या घरात ऑम्लेट बनवताना दिसून येत आहेत, विकीला हे ऑम्लेट जमले नसले तरी त्याच्या फॅन्सने मात्र या प्रयत्नावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

वरुण धवन

वरुण सुद्धा आपल्या किचन मध्ये अंडी बनवत असल्याचे त्याने शेअर केलेल्या व्हिडिओत दिसत आहे.

प्रिटी झिंटा

प्रिटी झिंटा हिने आपल्याला मिळालेल्या वेळेचा वापर करून घरात मसाला डोसा बनवणे शिकून घेतले आहे.

दरम्यान, कोणत्याही सिनेमाचे शूटिंग होणार नसल्याने अजून येत्या काळात म्हणजे १४ एप्रिल पर्यंत तरी या मंडळींना पूर्ण आराम आहे. अजूनही लॉक डाऊन संपायला बराच वेळ असल्याने उरलेल्या दिवसात ही मंडळी काय काय नवीन गोष्टी शिकतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे, तुम्हीही आपला वेळ कसा घालवताय हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा.