कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन ठेवण्यात आले आहे. या मुळे सर्व शूटिंग्स रद्द झाल्याने रुपेरी पडद्यावरील सर्व कलाकार घरीच आहेत. नेहमी आपल्या बिझी शेड्यूलमुळे घरात पाय न टिकणारे हे कलाकार सध्या घरात आपल्या कुटूंबियांसोबत छान वेळ घालवताना वा घरातील कामे करताना दिसत आहे. त्यामुळे घरातील कामे करणारी ही सिने कलाकारांचे एक वेगळेच रुप त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळत आहे. या संधीचा फायदा घेऊन रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याची पत्नी जेनेलिया डिसूजा देशमुख (Genelia D'souza Deshmukh) हिने घेतला आहे. आपल्या नव-याला तिने घरातील एक महत्वाचे काम करायला दिले आहे. याचा टिकटॉक व्हिडिओ बनवून रितेशने हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.
जेनेलिया रितेश देशमुख कडून घरातील भांडी घासण्याचे काम करुन घेत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. रितेश बिचारा भांडी घासत आहे आणि त्याला दमदाटी करण्यासाठी जेनेलियाने हातात लाटणं घेतले आहे. या व्हिडिओमागे 'मोका मिलेगा तो हम बतादेंगे' हे गाणं खूपच जुळून आले आहे.
पाहा हा मजेशीर टिकटॉक व्हिडिओ:
हेदेखील वाचा- Janta Curfew: रितेश देशमुख-जेनेलिया डिसूजा यांनी 'जनता कर्फ्यू'ला पाठिंबा देत दिला खास संदेश; पहा TikTok Video
या व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडिओला आतापर्यंत 25 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अशा अनेक मजेशीर व्हिडिओंसह रितेश-जेनेलिया सामाजिक संदेश देणारे व्हिडिओही शेअर करत असतात.
22 मार्चला झालेल्या जनता कर्फ्यू मध्ये सहभागी होण्यासाठी या दाम्पत्यांनी मिळून चाहत्यांना जनता कर्फ्यू मध्ये सहभागी होण्याचे आणि घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते.