Janta Curfew: रितेश देशमुख-जेनेलिया डिसूजा यांनी 'जनता कर्फ्यू'ला पाठिंबा देत दिला खास संदेश; पहा TikTok Video
Riteish Deshmukh & Genelia D'souza (Photo Credits: Twitter)

जगभरात हाहाकार घालणारा कोरोना व्हायरस भारतात दाखल झाला आणि या विषाणूंनी भारताला ग्रासायला सुरुवात केली आहे. भारतात कोरोनाचे एकूण 324 रुग्ण आढळून आले असून त्यात 5 जणांचा बळी गेला आहे. भारतात कोरोना व्हायरसचा झपाट्याने होणारा प्रसार पाहता आज जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या जनता कर्फ्यू आवाहनाला देशभरातील नागरिकांनी कडकडीत बंद पाळून आपला उत्स्फुर्त सहभाग दर्शवला आहे. बॉलिवूड सेलिब्रेटींनी देखील जनता कर्फ्यूला आपला पाठिंबा दाखवला आहे. (अमिताभ बच्चन, अजय देवगन, शिल्पा शेट्टी, अनुष्का शर्मा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'जनता कर्फ्यू' आवाहनाला पाठिंबा)

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया डिसूजा (Genelia D'souza) यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन टिकटॉक व्हिडिओद्वारे केले आहे. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. "घरी रहा, सुरक्षित रहा. कोरोना फाईट्स अगेंस्ट कोरोना," असा संदेश व्हिडिओतून देण्यात आला आहे. त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी राष्ट्रगीत वाजते तेव्हा रितेश-जेनेलिया हात जोडून उभे असलेले पाहायला मिळत आहेत.

पहा व्हिडिओ:

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छतेसोबतच गर्दी टाळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. दिवसागणित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून नागरिकांनी सूचनांचे पालन करावे असे आवाहन सर्वच स्तरातून केले जात आहे. त्याचबरोबर कोरोना व्हायरस संबंधित जनजागृती करण्यासाठी विविध माध्यमातून संदेश दिले जात आहेत.