Ajay Devgan, Amitabh Bachchan & Shilpa Shetty (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसने देशात शिरकाव केला असून हळूहळू रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाने संपूर्ण देशाला पोखरु नये म्हणून सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोना व्हायरसमुळे देशातील परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्या रविवार, 22 मार्च रोजी 'जनता कर्फ्यू' पाळण्याचे आवाहन केले आहे. 'जनता कर्फ्यू'च्या काळात सकाळी 7 ते रात्री 9 दरम्यान घराबाहेर पडू नका असे मोदींकडून सांगण्यात आले आहे. जनतेच्या हितासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाचे बॉलिवूडकरांनी स्वागत केले आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan), अनुपम खेर (Anupam Kher), शाहरुख खान (Shahrukh Khan), अनुष्का शर्मा (Anushka Sharma), रितेश देशमुख (Riteish Deshmukh), अजय देवगन (Ajay Devgan), करण जोहर (Karan Johar) यांच्यासह अनेक सेलिब्रेटींनी ट्विटच्या माध्यमातून जनता कर्फ्यूला पाठिंबा दर्शवला आहे. (Coronavirus: येत्या 22 मार्च रोजी COVID-19 विरोधात 'जनता कर्फ्यू' पाळावा- पंतप्रधान नरेंद्र मोदी)

अमिताभ बच्चन:

शाहरुख खान:

अक्षय कुमार:

अनुपम खेर:

अनुष्का शर्मा:

अजय देवगन:

रितेश देशमुख:

करण जोहर:

वरुण धवन:

शिल्पा शेट्टी-कुंद्रा:

सध्या देशात कोरोना व्हायसरचे एकूण 271 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी 'जनता कर्फ्यू' सारखा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मोदींच्या या निर्णयाचे बॉलिवूडकरांनी स्वागत केले असले तरी सामान्य जनता याला कसा प्रतिसाद देते, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.