Coronavirus: येत्या 22 मार्च रोजी COVID-19 विरोधात 'जनता कर्फ्यू' पाळावा- पंतप्रधान नरेंद्र मोदी
Prime Minister Narendra Modi | File Image | (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) म्हणजेच सीओव्हीआयडी-19 (COVID-19) संकटाचा सामना करण्यासाठी येत्या 22 मार्च (रविवार) रोजी सकाळी 7 ते  रात्री 9 या कालावधीत 'जनता कर्फ्यू' (Janta Curfew) आयोजित करण्यात आला आहे. जनता कर्फ्यू म्हणजे जनतेने जनतेसाठी आयोजित केलेला कर्फ्यू. जनता कर्फ्यू काळात कोणताही नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घरातच राहावे. समाजात जाऊ नये. जे केवळ अत्यावश्यक सेवा देणारे नागरिक आहेत त्यांनीच केवळ घराबाहेर पडावे. हे आपल्या आत्मसन्माची गोष्ट आहे. आत्मसन्मान ही देशभक्तीच आहे. देशातील सर्व राज्य सरकारांनी जनता कर्फ्यूचे पालन करावे, असे अवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रदान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी जनतेला आज सायंकाळी संबोधीत केले या वेळी ते बोलत होते.

कोरोना व्हायरस संकटाचा सामना मोठ्या धीराने करायला हवा - पंतप्रधान

कोरोना व्हायरस संकटाचा सामना मोठ्या धीराने करायला हवा. कोरोना हे संकट सामान्य नाही. त्याला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. जगभरातील कोरोना संक्रमीत देशांवर आमचे बारीक लक्ष आहे. जगभरात कोरोना संक्रमीत नागरिकांची संख्या प्रचंड मोठी आहे. म्हणूनच भारतानेही कोरोना व्हायरस नियंत्रित करण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यायला हवी. कोरोनाचा परिणाम भारतावर होणार नाही, असे म्हणने हा केवळ भ्रम आहे, अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सीओव्हीआयडी-19 (COVID-19) बाबत गांभीर्य ध्यनात आणून दिले. अनेक सूचना देतानाच पंतप्रधानांनी नागरिकांना काळजी घेण्याचे अवाहनही केले. कोरोना व्हायरस नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधीत केले. या वेळी ते बोलत होते.

एएनआय ट्विट

संकल्प आणि संयम हेच कोरोनाला उत्तर - पंतप्रधन

देशातील जनतेने मला कधीही निराश केले नाही. मी जेव्हा जेव्हा जनतेला काही मागितले आहे तेव्हा जनतेने मला ते दिले आहे. म्हणूनच कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी जनतेने मला पुढचे 3 ते 4 आठवडे द्यावेत. सोशल डिस्टन्स बाळगावा. सोशल डीस्टन्स याचा अर्थ स्वत:ला समाजात घेऊन न जाणे. काही काळ समाजापासून दूर राहणे. असेही पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले. संकल्प आणि संयम हेच कोरोनाला उत्तर आहे. जनतेने घाबरुन जाऊ नये, असे अवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी केले. (हेही वाचा, Coronavirus: केंद्र सरकारचे आदेश, 50 % केंद्रीय कर्मचारी करणार 'वर्क फ्रॉम होम'; विदेशातील विमानांना भारतात येण्यास बंदी)

एएनआय ट्विट

येत्या 22 मार्चला सायंकाळी 5 वाजता दरवाजात उभे राहून घंटी वाजवा - पंतप्रधान मोदी

कोरोना व्हायरसच्या अत्यंत कठीण संकटाचा सामना करण्यासाठी काही लोक अत्यावश्यक सेवा देत आहेत. ही सेवा या काळात देणे अत्यंत महत्वाची बाब आहे. डॉक्टर्स, परिचारिका, केंद्र सरकारी कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी, ऑनलाईन फूड सेवा देणारे डिलीव्हरी बॉय, कुरीअरवाले, ज्ञात अज्ञात नागरिक या सर्वांचे कौतुक करावे तितके थोडेच आहेत. म्हणूनच येत्या रविवारी (22 मार्च) सायंकाळी 5 वाजता पाच मिनिटे घराच्या दरवाजात, खिडकीत आभार मानावेत. जेणेकरुन या सर्वांचा उत्साह वाढेन.

एएनआय ट्विट

कामावर येऊ न शकणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन कापू नका - पंतप्रधान मोदी

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर कामावर अथवा ऑफिसला येऊ न शकलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन कापण्यात येऊ नये. कर्मचाऱ्यालाही आपल्याप्रमाणेच घर, कुटुंब आहे. तोही आपल्याप्रमाणेच कोरना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लढतो आहे. कुटुंबाला वाचवत आहे. म्हणूनच मानवतेच्या दृष्टीकोनातून त्याला सहकार्य करा. त्याचे वेतन कापू नका असे अवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

एएनआय ट्विट

जीवानावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी गर्दी करु नका - पंतप्रधान मोदी

देशभरातील नागरिकांना दूध, अन्नधान्य, आदी गोष्टींचा पूरवठा करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्नशिल आहे. त्यामुळे जनतेने जीवानावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी गर्दी करु नये. सर्व गोष्टी नियमीतपणे नागरिकांना मिळतील. फक्त जनतेने गर्दी टाळावी आणि स्वत:ची काळजी घ्यावी इतकेच आवश्यक आहे असे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.