Vicky Kaushal आणि Katrina Kaif रिलेशनशिपमध्ये? Harshvardhan Kapoor ने केला महत्त्वपूर्ण खुलासा
Vicky Kaushal & Katrina Kaif (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या रिलेशनशीपची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. या दोघांच्या रिलेशनच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. सोशल मीडियावर देखील कतरिना-विक्कीचे लव अफेअर चांगलेच चर्चेत आहे. या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. मात्र अद्याप या दोघांनी आपल्या नात्याबद्दल खुलासा केलेला नाही. परंतु, आता या दोघांच्या नात्याबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे.

विक्की आणि कतरिनाचा मित्र हर्षवर्धन कपूर (Harshvardhan Kapoor) याने या दोघांच्या नात्यावरील पडदा उठवला आहे.  सेलिब्रिटी चॅट शो दरम्यान हर्षवर्धनने एका प्रश्नाचे उत्तर देताना याबद्दल महत्त्वपूर्ण विधान केले. "इंडस्ट्री मधील कोणते रिलेशनशीप रुमर खरे मानता?" असा प्रश्न हर्षवर्धन याला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला की, "विक्की आणि कतरिना एकत्र आहेत आणि हे खरे आहे." यानंतर पुढे तो म्हणाला की, "हे सांगून मी समस्या तर ओढावून नाही घेतली ना?" (Katrina Kaif ने निळ्याशार समुद्रकिनारी केलेले 'हे' ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोशूट पाहून चाहते होतील दंग, Watch Video)

विक्कीच्या वाढदिवसानिमित्त कतरिनाने इंस्टग्रामवर खास पोस्ट केली होती. विक्कीचा जूना फोटो शेअर करत तिने लिहिले होते, "हॅप्पीएस्ट बर्थडे विक्की कौशल. तु असाच हसत रहा." (अभिनयासोबतच Looks मध्ये सुद्धा भल्याभल्यांना मागे टाकेल अशा विक्की कौशल चे 'हे 10' फोटो आहेत खूपच हॉट)

दरम्यान, एप्रिल महिन्यात विक्की आणि कतरिनाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर दोघांनीही कोरोनावर यशस्वीपणे मात केली.