Katrina Kaif ने निळ्याशार समुद्रकिनारी केलेले 'हे' ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोशूट पाहून चाहते होतील दंग, Watch Video
Katrina Kaif Photoshoot (Photo Credits: Instagram)

'शीला की जवानी', 'चिकनी चमेली' सारख्या अनेक आयटम साँगमधून चाहत्यांना मदहोश करणारी कटरीना कैफ (Katrina Kaif) ची जादू जगभरात पसरली आहे. तिचा बोल्ड (Bold) आणि ग्लॅमरस लूक (Glamorous Look) पाहून भलेभले दंग होतात. कुठलाही आऊटफिट असो, डान्स स्टाईल असो ती अगदी सहजपणे कॅरी करते. अभिनयाच्या बाबतीत ती इतर अभिनेत्रींप्रमाणे ती जराशी मागे असली तरी ग्लॅमरस दुनियेत तिचा बोलबाला कायम आहे. अनेक जाहिराती, फोटोशूट, मॅग्जिनसाठी तिचे बोल्डशूट नेहमीच चर्चेत असते. नुकताच कटरीना ने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.

या व्हिडिओमध्ये ती एका निळ्याशार समुद्र किनारी फोटोशूट करताना दिसत आहे. यात तिने वेगवेगळ्या रंगाचे हॉट ड्रेसेस घालून फोटो काढताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला 14 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हेदेखील वाचा- Sooryavanshi and 83 Release: जानेवारी 2021 च्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकते 'सूर्यवंशी' आणि '83' चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा!

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कटरीनाने पहिला गुलाबी, दुसरा निळा आणि तिसरा लाल अशा तीन रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. कटरीनाने हे फोटो शूट पिकॉक मॅगझीनसाठी केले आहे.

कटरीना कैफ च्या कामाविषयी बोलायचे झाले तर, लवकरच ची रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत खिलाडी अक्षय कुमार दिसेल. त्यासह अजय देवगण, रणवीर सिंह सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन मुळे हा चित्रपट रखडला आणि याचे प्रदर्शन लांबणीवर पडले. मात्र लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या महिन्याच्या अंती या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.