ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचा मुलगा कुणाल गोस्वामी याला ई-शॉपिंगमध्ये 9000 रुपयांचा गंडा
Kunal Goswami (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार (Actor Manoj Kumar) यांचा मुलगा कुणाल गोस्वामी (Kunal Goswami) याला ई-शॉपिंग दरम्यान 9000 रुपयांचा गंडा घातला आहे. त्याने ई शॉपिंगमध्ये सूटकेस खरेदी करण्यासाठी जेव्हा फेसबुकच्या जाहिरातीवरील लिंकवर क्लिक केले तेव्हा त्यांच्या क्रेडिट कार्ड मधून चक्क 9000 डेबिट झाले.

हा फसवा व्यवहार चीनी युआन चलनामध्ये झाले. संबंधित घटनेचा तपास घेण्यासाठी पोलिसांनी सायबर पोलिसांची देखील मदत घेतली आहे.

ही घटना 21 जून रोजी घडली. यात गोस्वामी यांच्या कार्डमधून दोन व्यवहार झाले. त्यातील एक व्यवहार हा 426 युआन आणि दुसरा 483 युआन इतका होता. हे दोन्ही व्यवहार केवळ 8 मिनिटांच्या अंतरात झाले. यावर कुणाल यांनी त्वरित कस्टमर केअर ला नंबर करुन कार्ड ब्लॉक करायला सांगितले.

हेही वाचा- पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबाची फसवणूक; ऑनलाईन चोरी करून लाखो रुपयांना गंडा

जुहू पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास चालू आहे.