
बॉलिवूडचा हँडसम अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) याचा आज 33 वा वाढदिवस आहे. दरम्यान कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त पार्टी, सेलिब्रेशन काहीही करता येणार नाही. मात्र वरुणने आपला खास दिवस वाया जावू दिला नाही. वरुणच्या कुटुंबियांनी देखील त्याचा वाढदिवसाचा दिवस स्पेशल केला आहे. 23 एप्रिल रात्री 12 वाजताच आपल्या कुटुंबियांसह केक कापत वरुणने 33 वा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे फोटोज सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
वरुणने इन्स्टा स्टोरी वर काही फोटोज शेअर केले. ज्यात केक समोर बसून वरुन स्माईल करत आहे. वरुणच्या बर्थडे निमित्त खास हार्ड शेप केक आणि त्यावर मेणबत्त्या असा थाट फोटोत पाहायला मिळत आहे. तो केक कट करत वरुणने वाढदिवस साजरा केला. केक पाहता तो घरीच बनवला असावा हे लक्षात येते. (वरुण धवन याचा नवा अंदाज; Lockdown वर बनवले खास रॅपसॉन्ग- Watch Video)
पहा फोटो:

वाढदिवसानिमित्त वरुण लाईव्हद्वारे चाहत्यांशी संवाद साधणार आहे. याची माहिती सोशल मीडियावर देत वरुणने लिहिले की, "कोण म्हणत मी एकटा आहे, कोण म्हणत तुम्ही एकटे आहात." लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष भेटणे शक्य होणार नाही त्यामुळे सोशल मीडियाचे माध्यमातून वरुण चाहत्यांशी कनेक्टेड राहणार आहे.
अलिकडेच वरुण धवन 'स्ट्रीट डांसर 3डी' या सिनेमात श्रद्धा कपूर सह प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सारा अली खान सह 'कुली नंबर 1' हा वरुणचा नवा सिनेमा येऊ घातला आहे. दरम्यान कोरोना व्हायरसच्या संकटात वरुणने आर्थिक मदतीचा हात पुढे करत सामाजिक भान जपले आहे.