कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटाचा सामना करण्यासाठी भारत देशात लॉकडाऊन (Lockdown) घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्याला बराच वेळ रिकामा मिळाला आहे. अनेक सेलिब्रेटी या वेळेचा सदुपयोग करताना दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) याचा नवा अंदाज समोर येत आहे. मिळालेल्या रिकाम्या वेळेचा उपयोग करत वरुण धवन याने लॉकडाऊनवर एक रॅप तयार केला आहे. ज्यात त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा वापर केला आहे. या रॅपसॉन्ग द्वारे वरुण आपल्या चाहत्यांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत आहे. '...तो कोरोना होगा' असे या रॅपचे बोल असून यातून घरी रहा, सुरक्षित रहा असा संदेश वरुणने दिला आहे.
वरुण धवन याने हा रॅपसॉन्ग व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. वरुणच्या या व्हिडिओवर चाहत्यांसह सेलिब्रेटींच्या कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. अर्जुन कूपर, आयुष शर्मा यांसारख्या सेलिब्रेटींनी व्हिडिओवर कमेंट करत वरुणच्या सुरांची प्रशंसा केली आहे.
पहा व्हिडिओ:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लॉकडाऊनच्या निर्णयाचे बॉलिवूड सेलिब्रेटींनी अगदी उत्साहात स्वागत केले आहे. इतकंच नाही तर जनता कर्फ्यू च्या दिवशी अनेक सेलिब्रेटींनी टाळ्या आणि घंटा वाजवून अत्यावश्यक सेवा पूरवणाऱ्या डॉक्टर, पोलिसांसह सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. (अभिनेत्री सुश्मिता सेन हिने COVID-19 विरोधात लढण्यासाठी सांगितले 100% गुणकारी ठरणारे औषध)
कोरोना बाधितांची संख्या देशात दिवसागणित वाढत आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 800 च्या वर गेली असून राज्यात कोरोनाचे एकूण 159 रुग्ण आहेत. त्यामुळे वाढता धोका टाळण्यासाठी सरकारसह वरुण धवनच्या आवाहनचे पालन करणे हितावह ठरेल.