Urvashi Rautela हिच्याकडून हॉटेलमध्ये घडली मोठी चूक, सोशल मीडियात हात जोडून मागितली माफी
Urvashi Rautela (Photo Credits-Instagram)

बॉलिवूड मधील अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिच्या चाहत्यांची संख्या खुप आहे. सोशल मीडियात उर्वशी नेहमीच अॅक्टिव्ह राहत असून ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा शेअर करत असते. ऐवढेच नाही तिची एक झलक पाहण्यासाठी सुद्धा तास न तास वाट पाहत राहतात. नुकतीच ती भारताच्या बाहेर टिबिलिसमध्ये शूटसाठी दाखल झाली होती. ज्या हॉटेलमध्ये ती थांबली होती तेथे तिच्याकडून एक मोठी चूक झाली आहे. त्यामुळे तिने सोशल मीडियात हात जोडून माफी सुद्धा मागितली आहे.

उर्वशी हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून तो खुप व्हायरल होत आहे. तोच व्हिडिओ तिने आपल्या इंन्स्टाग्रामवर ही शेअर केला आहे. त्यात उर्वशी हिच्या एका चाहत्याने तिच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. चाहत्याची नाराजी पाहिल्यानंतर तिने माफी मागितली आहे.(Bigg Boss 15: रिया चक्रवर्ती पासून दयाबेन उर्फ Disha Vakani पर्यंत 'हे' कलाकार सामील होऊ शकतात बिग बॉस 15 मध्ये)

खरंतर अभिनेत्रीला भेटण्यासाठी काही चाहते तिची 72 तास न झोपता वाट पाहत होते. मात्र जेव्हा उर्वशी हॉटेलच्या खाली आली तेव्हा तिने पाहिले चाहत्यांकडून तिची वाट पाहिली जात आहे. पण तिला लवकर दुसरीकडे जायचे होते. यामुळे तिला चाहत्यांसोबत फोटो क्लिक करता आला नाही. चाहत्याने व्हिडिओ तयार करत सोशल मीडियात अपलोड केल्यानंतर तिने तो पाहिला असता तेव्हा माफी मागितली.

उर्वशी हिच्या करियर बद्दल बोलायचे झाल्यास तिने बॉलिवूड मधील काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2016 रोजी प्रदर्शित झालेल्या सनम रे, ग्रँन्ड मस्ती, 2018 मधील हेट स्टोरीसह आणखी काही सिनेमांमध्ये ती दिसली होती. त्याचसोबत उर्वशी हिने काही म्युझिक व्हिडिओत सुद्धा काम केले आहे. सध्या ती आगीमी वेब सीरिज 'इंस्पेक्टर अविनाश' यामध्ये व्यस्त आहे. यामध्ये तिच्यासोबत रणदीप हुड्डा सुद्धा झळकणार आहे.