Bigg Boss 15: रिया चक्रवर्ती पासून दयाबेन उर्फ Disha Vakani पर्यंत 'हे' कलाकार सामील होऊ शकतात बिग बॉस 15 मध्ये
रिया चक्रवर्ती (Photo Credits: Instagram)

सलमान खानचा (Salman Khan) शो बिग बॉस (Bigg Boss) हा टीव्ही जगतातील लोकप्रिय शोजपैकी एक आहे. बघता बघता या शोचे 14 सिझन झाले असून आता 15 वा सिझन (Bigg Boss 15) येऊ घातला आहे. नेहमीप्रमाणे यंदाच्या सिझनमध्ये कोणते घरामध्ये येणार याबाबत चर्चा रंगू लागली आहे. काही दिवसांपूर्वी वृत्त आले होते की, दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांच्यासह अंकिता लोखंडेशी निर्मात्यांनी संपर्क साधला आहे. अलीकडेच 'बालिका वधू' फेम गहना म्हणजेच नेहा मार्दानेही सांगितले की तिला 'बिग बॉस 15' ची ऑफर मिळाली आहे. दरम्यान, आता आणखी काही सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत, ज्यांना निर्मात्यांनी अप्रोच केले आहे.

'बिग बॉस 15' सुरू होण्यास अजून बराच कालावधी बाकी आहे, पण 14 वा हंगाम संपताच निर्मात्यांनी 15 व्या सीझनची तयारी सुरू केली होती. 'बिग बॉस 14' च्या समाप्तीनंतर सामान्य लोकांच्या प्रवेशासाठी नोंदणी सुरू झाली असताना, आता निर्मात्यांनी सेलिब्रिटी जोडप्यांसह अनेक सिंगल सेलिब्रिटींकडे संपर्क साधला आहे.

‘इंडिया डॉट कॉम’ आणि ‘स्पॉटबॉय’ च्या वृत्तानुसार सुशांत सिंग राजपूतशी असलेल्या संबंधामुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला ‘बिग बॉस 15’ साठी संपर्क साधण्यात आला आहे. रियाने अजूनतरी या गोष्टीची पुष्टी केली नाही, मात्र जर अभिनेत्रीने शोमध्ये सामील होण्यास सहमती दर्शवली तर चाहत्यांसाठी ती पर्वणी असणार आहे. यासह ‘तारक मेहता का उल्टा चश्मा' ची दयाबेन उर्फ दिशा वकानी हिलाही निर्मात्यांनी संपर्क साधल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. (हेही वाचा: Karan Mehra विरुद्ध FIR दाखल केल्यानंतर पत्नी Nisha Rawal आली मिडियासमोर, पतीवर लावले 'हे' गंभीर आरोप)

सध्या सोशल मिडियावर अशी एक यादी फिरत आहे, ज्यामध्ये काही संभाव्य कलाकारांची नावे आहेत जी बिग बॉस 15 मध्ये दिसू शकतात. यामध्ये निया शर्मा, कॉमेडियन कृष्णा अभिषेक, 'नागिन 5' फेम सुरभि चंदना, पार्थ समथान, मोहसीन खान, अनुषा दांडेकर आणि सनाया इराना यांचा समावेश आहे. मात्र अजूनतरी निर्मात्यांकडून याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.