Karan Mehra विरुद्ध FIR दाखल केल्यानंतर पत्नी Nisha Rawal आली मिडियासमोर, पतीवर लावले 'हे' गंभीर आरोप
Nisha Rawal (Photo Credits: Instagram/ViralBhayani)

'ये रिश्ता कहलाता है' फेम करण मेहरा (Karan Mehra) याच्याविरोधात त्याची पत्नी निशा रावल (Nisha Rawal) हिने आपल्यावर मारहाण केल्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण मिडियासमोर उघडकीस आले. त्यानंतर करणला अटकही करण्यात आली. मात्र काही तासांतच त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र त्यानंतर या हे दोघे जण मिडियासमोर येण्याची सर्वजण वाट पाहत होते. त्यात अखेर निशा रावल ही मिडियासमोर येऊन आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत गंभीर खुलासा केला. यावेळी तिने पती करणवर गंभीर आरोप देखील लावले.

निशाने मिडियाला दिलेल्या माहितीनुसार, करणचे विवाहबाह्य संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. ती आपल्या मुलासाठी करणसोबत राहत होती. मात्र या दोघांमध्ये फार तणाव होते. ज्यानंतर ह्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मात्र आता तिने करणने आपल्याला मारहाण केल्याचा तसेच शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. मिडियाशी बोलताना निशा खूप भावूक झाली होती.हेदेखील वाचा- Actor Karan Mehra Arrested: Yeh Rishta Kya Kehlata Hai फेम अभिनेता करण मेहरा यास अटक

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आपल्याला झालेल्या मारहाणीचा फोटो पाहून तिचे अश्रू अनावर झाले. या फोटोमध्ये तिच्या डोक्याला मार लागल्याचे दिसत आहे. यामुळे मिडियाशी बोलताना तिने डोके ओढणीने झाकले होते.

दरम्यान करण मेहराने देखील यावरील आपले मौन सोडत एक धक्कादायक खुलासा केला आहे. 'आपण निशावर हात उचलला नसून तिने स्वत:च आपले डोके भिंतीवर आपटले. तसेच तिच्या भावाने आपल्याला मारहाण केल्याचे आणि शिवीगाळ केल्याचेही त्याने सांगितले.'

या संपूर्ण प्रकरणामध्ये निशा आणि करणने आपापली बाजू मांडली असली तरी पोलिस या घटनेची कसून चौकशी करत आहे.