सोनाक्षी सिन्हा हिच्यावर गुन्हा; फसवणूकीच्या आरोपाचा तपास करण्यासाठी पोलीस घरी दाखल
Actress Sonakshi Sinha (File Photo: IANS)

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha)  हिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश पोलीसांनी कटघर पोलीस स्टेशन (Katghar Police Station )  मुरादाबाद येथे हा गुन्हा नोंद झाला आहे. भारतीय दंड संहिता कलम 420 (फसवणूक) आणि 406 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाक्षी सिन्हा हिच्यावर  24 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

दरम्यान,  गुन्ह्याचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीसांनी सोनाक्षी सिन्हा हिच्या मुंबई येथील घरी हजेरी लावली. मात्र, ती घरी नसल्याने पोलिसांना रिकाम्या हातानेच परत फिरावे लागले. दरम्यान, सोनाक्षी हिची प्रतिमा मलीन करण्यासठीच हा प्रकार केला जात असून, तिच्यावर होणारे सर्व आरोप हे खोटे आणि निराधार असल्याचे सोनाक्षी हिच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे.

प्राप्त माहितीनुसार,  आयोजकांकडून पैसे घेऊनही सोनाक्षीने त्या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली नाही, त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचा आरोप आयोजकांनी केला असून, तशी तक्रार पोलिसांत नोंदवली आहे. हा स्टेज शो स्वरुपाचा असलेला हा कार्यक्रमक 13 सप्टेंबर 2018 रोजी पार पडणार होता. त्यासाठी आयोजकांनी सोनाक्षी सिन्हा हिला 24 लाख रुपये देण्यात आल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. (हेही वाचा, वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पायल रोहतगी हिला ट्विटरवर केले ब्लॉक, केंद्रिय गृहमंत्री अमित शहांना पाठविले पत्र)

एएनआय ट्विट

दरम्यान, उत्तर प्रदेश पोलीस या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मुंबई येथील सोनाक्षी राहात असलेल्या जुहू येथील घरी पोहोचले. सोनाक्षीच्या घरी पोहोचण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी जुहू पोलिसांची मदत घेतल्याचेही समजते. दरमयान, पहिल्या फेरीत सोनाक्षी घरी सापडलीच नाही. त्यामुळे आजही पुन्हा एकदा पोलीस तिच्या घरी पोहोचू शकतात.