वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पायल रोहतगी हिला ट्विटरवर केले ब्लॉक, केंद्रिय गृहमंत्री अमित शहांना पाठविले पत्र
Payal Rohatgi (Photo Credits: Instagram)

आपल्या वादग्रस्त विधानामुळे वादाच्या भोव-यात अडकलेली अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohtagi) पुन्हा एकदा चर्चेत आलीय ती मुंबई पोलिसांनी तिला ट्विटरवर ब्लॉक केल्यामुळे. काही दिवसांपूर्वी तिने छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केले होते. त्यावर सोशल मिडियावरुन लोकांनी संताप व्यक्त केला होता. आणि पायल रोहतगी सर्वांची माफी मागितली होती. त्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरुनच मुंबई पोलिसांनी पायलला ट्विटरवर ब्लॉक केले आहे. आपल्याला ब्लॉक केल्याने पायलने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवले असून आपण असुरक्षित आहोत असे या पत्रात म्हटले आहे.

मुंबई पोलिसांच्या अशाप्रकारच्या वागणुकीमुळे हिंदू म्हणून हिंदुस्तानात राहायची भीती वाटत असल्याचे रोहतगीने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी तिने राजाराम मोहन रॉय यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट केले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळातील नसून त्यांचा जन्म शुद्र शेतकरी कुटुंबात झाल्या असल्याचे विधान तिनं केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियातून तिच्यावर प्रचंड टीका झाली.