Yami Gautam performance during the Mumbai police show at Mumbai | (Photo courtesy: archived, edited images)

Umang 2019: प्रसि्ध मॉडेल आणि अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam ) हिने यंदाच्या उमंग (Umang 2019 ) कार्यक्रमात सहभाग घेत विविध गाण्यांवर नृत्य केले. खास करुन 'चल छैया छैया', 'ले गई... ले गयी' या गाण्यांवर तिने केलेला डान्स उपस्थितांना नव्वदीच्या दशकात घेऊन गेला. मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर तिच्या या नृत्याविष्काराचा व्हिडिओही पोस्ट करण्यात आला आहे. दरम्यान, यामी गौतम हिच्यासोबतच Arjun Kanungo आणि Shiamak Davar यांच्यासारख्या कलाकारांनीही परफॉर्मन्स केला. या सर्वच कलाकारांच्या कलाविष्काराला उपस्थितांनी जोरदार दाद दिली. मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि बॉलिवूड यांच्या संयुक्त विद्यमाने उमंग (Umang) या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

मुंबई आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यात पोलिसांचा मोठा वाटा असतो. त्यातही मुंबईसारख्या महाकाय शहरातही कायदा व्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान असते. हे आव्हान मुंबई पोलिस समर्थपणे पार पाडतात. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून उमंग या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी सहभाग दर्शवला आहे. यात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अमिर खान तसेच, दीपिका पदुकोण, अलिया भट्ट, रेखा, अनुष्का शर्मा, कंगना रनौत, शिल्पा शेट्टी यांसारख्या बॉलिवूडच्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. (हेही वाचा, मुंबईत पार पडला खास पोलिसांसाठी 'स्वरतरंग 2018',अनेक दिग्गज मराठी कलाकारांनी लावली हजेरी)

सातत्याने तणावात काम करणाऱ्या मुंबई पोलिसांना त्याच्या नेहमीच्या व्यग्रतेतून थोडीसा विसावा मिळावा हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. गेली अनेक वर्षे हा कार्यक्रम मुंबईतील स्पोर्ट क्लबमध्ये आयोजीत करण्यात येत आहे. सुरुवातीच्या काळात या कार्यक्रमात बॉलिवुडच्या कलाकारांचाच अधिक वरचष्मा असे. मात्र, अलिकडील काळात मराठी कलाकारांचाही मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रात समावेश असतो.

अलिकडील काळात पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आले आहेत. अलिकडे मराठीत पुन्हा एकदा आशयघन चित्रपटांची निर्मिती होत आहे. तसेच, तंत्रज्ञान, प्रमोशन आणि मार्केटींग या सर्वच बाबींमध्ये मराठी चित्रपट आघाडी घेत असल्यामुळे ते बॉलिवूडलाही टक्कर देऊ पाहात आहेत. त्यामुळे उमंग (Umang) या कार्यक्रमातही मराठी कलाकार मोठ्या प्रमाणावर सहभागी होताना दिसतात.