The Lion King Teaser 2: आर्यन खानच्या दमदार आवाजात 'द लायन किंग' चा टीजर झाला प्रदर्शित, 'मेरा सिंबा' म्हणत शाहरुख ने शेअर केला व्हिडिओ
The Lion King Teaser (Photo Credits:Youtube, Twitter)

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने वाल्ट डिज्नी स्टूडियोज (Walt Disney Studios) प्रस्तुत 'द लायन किंग' (The Lion King) या सिनेमात आपला आवाज दिल्याचा टीजर याआधीच प्रदर्शित झाला होता. मात्र आता या सिनेमाचा दुसरा टीजर प्रदर्शित झाला आहे. यात चक्क शाहरुखचा मुलगा आर्यनने (Aryan Khan) 'सिंबा' या पात्रासाठी आपला आवाज दिल्याचा दिसत आहे. नुकताच शाहरुखने आपल्या ट्विटर अकाउंट हा टीजर पोस्ट केला. या चित्रपटाच्या हिंदी डब साठी सिनेमातील बाप लेकांसाठी ख-या आयुष्यातील बापलेकांनी म्हणजेच शाहरुख आणि आयर्नने आपला आवाज दिल्याने चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे.

या टीजरमध्ये सिंबासाठी आर्यनचा आवाज खूपच जबरदस्त वाटतोय. इतकच नव्हे तर जेव्हा तुम्ही त्याचा आवाज ऐकाल तेव्हा तुम्हाला शाहरुखच बोलतोय असे वाटेल. शाहरुखने ही पोस्ट शेअर करून 'मेरा सिंबा' असे लिहिले आहे.

याआधी शाहरुखने या चित्रपटाचा पहिला टीजर शेअर केला होता. ज्यात शाहरुख मुफासा या पात्रासाठी आपला आवाज दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख आणि आर्यन चा आवाज एकत्र ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

हेही वाचा- शाहरुख खान याच्या दमदार आवाजातील 'The Lion King' चा जबरदस्त टीझर (Watch Video)

जॉन फेवरो हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून मयूर पुरी यांनी 'द लायन किंग' च्या हिंदी सिनेमाची पटकथा लिहिली आहे. सिंबाच्या मूळ कथेला जराही न बदलता जॉन फेवरो यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 19 जुलै ला इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेमध्ये प्रदर्शित होईल.