शाहरुख खान याच्या दमदार आवाजातील 'The Lion King' चा जबरदस्त टीझर (Watch Video)
The Lion King (Photo Credits: Youtube)

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने अलिकडेच वाल्ट डिज्नी स्टूडियोज (Walt Disney Studios) चा सिनेमा 'द लायन किंग' (The Lion King) या सिनेमाला आपला आवाज दिला आहे. शाहरुखने या सिनेमाचा टीझर आज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला. यात सिम्बा आणि त्याची संघर्षमय कहाणी दाखवण्यात आली आहे. यातील सिम्बाच्या वडीलांच्या मुफासा (Mufasa) च्या व्यक्तिरेखेला शाहरुखने आपला आवाज दिला आहे.

शाहरुख आवाजात प्रेरक आणि जबरदस्त डायलॉग्स ऐकायला भारी वाटतात. 'द लायन किंग- द राइज ऑफ द किंग' (The Lion King- The Rise of the King) या सिनेमाचे दिग्दर्शन Jon Favreau यांनी केले आहे.

शाहरुख खान याचे ट्विट:

विशेष म्हणजे या सिनेमात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने देखील आपला आवाज दिला आहे. या दोघांचा एकत्रित असा हा एकच आवाज आहे. या प्रोजेक्टमध्ये असरानी, आशीष विद्यार्थी, संजय मिश्रा आणि श्रेयस तळपदे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

पहा व्हिडिओ:

The Lion King हा सिनेमा इंग्रजी सह हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार असून 19 जुलैला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.