The Accidental Prime Minister चा trailer युट्युबवरुन हटवला; अनुपेम खेर यांनी ट्विटरवरुन मागितली मदत
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भूमिकेतील अनुपम खेर (Photo Credits: Twitter)

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जीवनप्रवास उलघडणारा 'द एक्सीडेंटल प्राईम मिन्सिटर' (The Accidental Prime Minister) हा सिनेमा सध्या वादात अडकला आहे, असे म्हणायला हरकत नाही. या सिनेमात अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचा ट्रेलर (Trailer) काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. तेव्हा तो युट्युबवर (Youtube) ट्रेंड होत होता. मात्र आता तो व्हिडिओ युट्युबवर दिसत नाहीये. यामुळे अनुपम खेर काहीसे चिंतेत असून त्यांनी ट्विट करत युट्युबकडे मदत मागितली आहे. (हे ही वाचा: The Accidental Prime Minister सिनेमाच्या वादावर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया, राहुल गांधींनी विरोध करणार्‍यांना दटावले पाहिजे!)

अनुपम खेर यांनी ट्विट करत लिहिले की, डिअर युट्युब, "मला देशातील सर्व भागातून अनेक मेसेज आणि कॉल्स येत आहेत की 'द एक्सीडेंटल प्राईम मिन्सिटर'चा ट्रेलर युट्युबवर दिसत नाही आहे किंवा मग अगदी 50 व्या क्रमांकावर दिसत आहे. काल तर आम्ही प्रथम क्रमांकावर ट्रेंड होत होतो. कृपया आमची मदत करा." The Accidental Prime Minister : अपेक्षित बदल केले नाहीत, तर चित्रपट प्रदर्शित करू देणार नाही; सत्यजीत तांबे यांचा इशारा

या सिनेमात अक्षय खन्ना (Akshaye Khanna) संजय बारु या विशेष भूमिकेत दिसणार आहे. पत्रकार संयज बारु (Sanjaya Baru) हे 2004-2008 या काळात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे मीडिया सल्लागार होते. तर सिनेमात 'सोनिया गांधी' यांची भूमिका 'सुझेन बेरनर्ट' साकारणार असून 'अहाना कुम्रा' प्रियंका गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. 'अर्जुन माथून' राहुल गांधींच्या भूमिकेत झळकणार आहे. विजय रत्नाकर गुट्टे दिग्दर्शित हा सिनेमा 11 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.