दक्षिण सुपरस्टार राम चरण याने खरेदी केले नवे घर, किंमत ऐकूण अनेकजण थक्क
Telugu actor Ram Charan | (Photo credit: archived, edited, representative image)

दक्षिण सुपरस्टार (South Superstar) राम चरण (Ram Charan) म्हणजे टॉलिवूडमधील एक श्रीमंत अभिनेता. हा अभिनेता केवळ अभिनयच नव्हे तर, ब्रँड एडोर्समेंट आणि पर्सनल इन्वेस्टमेंटच्या माध्यमातूनही प्रचंड पैसा कमावतो. नुकतेच त्याने नवे घर खरेदी केल्याचे वृत्त आहे. या घराची किंमत (Ram Charan New Home Costs) ऐकून अनेकांना धक्का बसला. प्राप्त माहिती अशी की, या घराची किंमत तब्बल 38 कोटी रुपये इतकी आहे. दक्षिण भारतातील सेलिब्रेटींकडे असलेल्या घरांपैकी एक महागडे घर अशी या घराची ओळख आहे. या अभिनेत्याचे वार्षीक उत्पन्न सुमारे 1300 कोटी रुपये आहे.

अभिनेता राम चरण हे कोनिडेला प्रॉडक्‍शन कंपनी या नावाखाली स्वत:चे प्रोडॉक्शन हाऊसही चालवतात. या प्रोडॉक्शन हाऊसची निर्मिती असलेल्या आगामी चित्रपटातून राम चरण यांचे वडील चिरंजीवी मुख्य भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. सुमारे 150 कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटात जगपती बाबू, नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्यासारखे अभिनेतेही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. (हेही वाचा, सुपरस्टार रजनीकांत पुन्हा एकदा वरबाप; पाहा काय करतात 'सौंदर्या'पती जावई)

राम चरण यांच्या एकूण कारकीर्द आणि कामाबाबत सांगायचे तर, ते सध्या एसएस राजामौली याचा चित्रपट 'आरआरआर' मध्ये ज्यूनीयर एनटीआर यांच्यासोबत झळकताना दिसतील. या चित्रपटांकडून त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आशा आहेत. कारण राजामौली यांनी 'बाहुबली' आणि 'मगधीरा' यांच्यासारखे सुपरडूपर सिनेमे बनवले आहेत. या चित्रपटाचे अंदाजे बजेट 300 कोटी असल्याचे सांगितले जात आहे.