Tamil Actress Deepa aka Pauline Jessica (1) | (Photo Credit: Archived, edited, representative images)

दीपा (Deepa aka Pauline Jessica) नावाने प्रसिद्ध असलेली 29 वर्षीय तामिळ अभिनेत्री पॉलीन जेसिका (Tamil Actress Deepa aka Pauline Jessica) हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. दीपा हिने आत्महत्या केली असावी असा संशय आहे. चेन्नई (Chennai) येथील एका इमारतीमध्ये घराच्या छताला असलेल्या पंख्याला लटकलेला तिचा मृतदेह 18 सप्टेंबर रोजी आढळून आला. पोलिसांना तिच्या खोलीतून एक संशयास्पद चिठ्ठी आल्याची चर्चा आहे. या चिठ्ठीमुळे आत्महत्येच्या संशयासोबतच इतरही अनेक मुद्दे उपस्थित केले जात असून, उलटसुलट चर्चा आणि तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दीपा नावाने प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीने इतक्या कमी वयात आत्महत्या केल्याने दाक्षिणात्या सिनेसृष्टीला जोरदार धक्का बसला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, दीपा हिचा दोस्त प्रभाकरन सर्वात आधी घटनास्थळावर पोहोचला. तिचा मृतदेह पाहून प्रभाकरन याने आंध्र प्रदेश येथील चित्तूर येथे राहणाऱ्या दीपा हिच्या भावाला कल्पना दिली. त्यानंतर त्याने कोयम्बेडू पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली. प्राप्त माहितीनुसारत, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. तसेच, पुढील तपासही सुरु केला. (हेही वाचा, मुंबई: अभिनेत्री प्रज्ञा पारकर ने पोटच्या मुलीची हत्या करुन केली आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट)

दीपा नावाने प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीचे मूळ नाव पॉलीना जेसिका आहे. मात्र, सिनेसृष्टीत ती दीपा नावानेच ओळखली जात असे. दीपा हिने 'थुप्परिवालन' आणि 'वैथा' यांसारख्या हटके चित्रपटातून नाव कमावले होते. मूळची आंध्र प्रदेशची असेल्या दीपाने आत्महत्या केल्याने तिच्या मित्र आणि चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर तिच्या आत्महत्तेबद्द तीव्र दु:ख व्यक्त केले आपे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी दीपा हिच्या खोलीतून एक डायरीही जप्त केली आहे. ज्यात तिला आपले आयुष्य पसंत नव्हते. कारण तिला पाठिंबा देणारे कोणीच नव्हते, असे लिहिल्याचे सांगण्यात येत आहे. पुढे तिने आपल्या सुसाईड नोटमध्ये असेही म्हटले आहे की, तिचे कोणावर तरी प्रेम होते मात्र त्याने तिचा स्वीकार केला नव्हता. तो कोण होता याबाबत तिने स्पष्टपणे काहीच लिहिले नाही. डायरीतील मजकूर वाचून पोलिस दीपा हिच्या बॉयफ्रेंडचा शोध घेत असून, तिच्या आत्महत्येच्या कारणाचा तपास करत आहेत.