Image For Representation| (Photo courtesy: archived, edited, representative image)

ठाणे: टीव्ही मालिकांमधून अभिनय करणाऱ्या प्रज्ञा पारकर (Pradnya Parkar)  नामक महिलेने शुक्रवारी रात्री कळवा (Kalwa) येथील आपल्या राहत्या घरी पोटच्या मुलीची हत्या करून नंतर स्वतःही गळफास लावून घेतल्याची धक्कादायक घटना सध्या समोर होत आहे. याबाबत माहिती मिळताच कळवा पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रज्ञा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी के चिट्ठी लिहिली होती ज्यामध्ये मी मुलीची हत्या करून आता स्वतःही मुक्त होत आहे असे म्हंटले होते, मात्र यामागे नेमके काय कारण असेल याबाबत कोणताही खुलासा चिट्ठीतून होत नाही. Dr. Payal Tadvi Suicide Case: डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील 3 आरोपी डॉक्टरांना सशर्त जामीन मंजूर; मात्र मुंबई बाहेर जाण्यास मनाई

टाइम्सच्या वृत्तानुसार, कळवा येथील गौरी सुमन सोसायटीमध्ये प्रशांत पारकर पत्नी प्रज्ञा पारकर (40) व मुलगी श्रुती पारकर (18 ) सह राहत होते. प्रश्नत यांचा आयात निर्यातचा छोटा व्यापार होता तर प्रज्ञा या टीव्हीही मालिकांमधून छोटे-मोठे रोल करायच्या. श्रुती हि तूर्तास १२वीचे शिक्षण घेत होती. शुक्रवारी सकाळी 7.30 वाजता प्रशांत जिम मध्ये गेले होते व यावेळी घरी प्रज्ञा आणि श्रुती या दोघीच होत्या. यानंतर दोन तासांनी प्रशांत घरी परतल्यावर बराच वेळ दरवाजा वाजवत होते मात्र दार आतून बंद होते. बऱ्याच प्रयत्नांनी दरवाजा उघडल्यानंतर प्रशांत यांना समोर गळफास घेतलेल्या अवस्थेत प्रज्ञा तर चादरीत निपचित पडलेली मुलगी श्रुती दिसली. यामुळे गांगरून गेलेल्या प्रशांत यांनी तात्काळ या दोघींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत दोघींचाही मृत्यू झाला होता.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कळवा पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेत चौकशी चालू केली. कळवा पोलीस वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे यांनी तपासात मिळालेल्या चिट्ठीच्या आधारे प्रज्ञा यांनी मुलीची गळा दाबून हत्या करत नंतर त्यांनी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे. याप्रकरणी अद्याप कोणतेही कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास सुरु आहे.