
Sushant Singh Rajput Death Case: बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर इंडस्ट्री मधील अनेक कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांची चौकशी सुरु आहे. सोमवारी मुंबई पोलिसांनी दिगदर्शक निर्माते महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांची सुद्धा चौकशी केली. भट्ट यांनी पोलिसांना माहिती देताना काही महत्वपूर्ण खुलासे केले आहेत. सांताक्रूझ पोलीस स्थानकात महेश भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतला सडक 2 या सिनेमासाठी आपल्याकडून कधीच विचारणा झाली नव्हती, तसेच आजवर आपण केवळ दोनदाच सुशांतला भेटलो आहोत असेही महेश भट्ट यांनी सांगितले आहे. वास्तविक, महेश भट्ट यांचा भाऊ मुकेश भट्ट यांनी आपल्याकडून सुशांत शी 'आशिकी 2' आणि 'सड़क 2' साठी बातचीत झाली होती असे म्हंटले होते मात्र आता महेश भट्ट यांनी ह्या माहितीची पुष्टी केलेली नाही. Sushant Singh Rajput case: कंगना रौनौत हिला समन्स, करण जौहर यांच्या मॅनेजर्सची होणार चौकशी- अनिल देशमुख
महेश भट्ट यांनी पुढे सांगितले की, 'सड़क 2' साठी पहिल्यापासूनच संजय दत्त डोक्यात होते, त्यामुळे सुशांतशी बातचीत होण्याचा संबंधच नव्हता. उलट सुशांत नेच महेश यांना कॉल करून आपल्याला सडक 2 मधील कोणत्याही रोल साठी विचारात घ्यावे असे सांगितले होते. महेश भट्ट म्हणतात की, मी 2018 मध्ये सुशांतला भेटलो होतो. आणि त्यानंतर जेव्हा फेब्रुवारी मध्ये सुशांतची तब्येत ठीक नव्हती तेव्हा बांद्रा च्या घरी भेटण्यासाठी गेलो होतो. याशिवाय आपण सुशांतशी फार जोडलेले नव्हतो. शिवाय आजवर वयक्तिक किंवा व्यावसायिक अशी सविस्तर चर्चा सुद्धा झालेली नव्हती.
दरम्यान, महेश भट्ट यांचे भाऊ मुकेश भट्ट यांनी टाइम्स नाऊ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, सुशांत च्या वागण्या बोलण्यातील फरक आपण पाहिला होता तेव्हाच आपल्याला संशय होता. सुशांत सुद्धा परवीन बाबी प्रमाणे जीवन संपवेल अशी भीतीही वाटली होती त्यामुळे जेव्हा ही आत्महत्येची माहिती समोर आली तेव्हा फार धक्का बसला नाही.