Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी NCB कडून दीपेश सावंत याला अटक
Sushant Singh Rajput Death Case (Photo Credits-ANI)

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह (Sushant Singh Rajput) राजपूत याच्या मृत्यूप्रकरणे दिवसागणिक नवे खुलासे होताना दिसून येत आहेत. याच दरम्यान एनसीबीकडून (NCB) आता दीपेश सावंत (Dipesh Sawant) याला अटक करण्यात आली आहे. याबद्दल नार्कोटिक्स कंन्ट्रोल ब्युरोचे डेप्युटी डिरेक्टर केपीएस मल्होत्रा यांनी माहिती दिली आहे. यापूर्वी सुशांतच्या मृत्यूप्रकरणी शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा याला ही अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज संबंधित खुलासा झाल्याने आता आणखी काय गोष्टी समोर येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.(Sushant Singh Rajput Case: बॉलिवूड मधील ड्रग्जचे गुढ उघकीस आणण्यास शौविक चक्रवर्ती करु शकतो मदत: एनसीबी)

दीपेश सावंत याला आता अटक केल्यानंतर सकाळी 11 वाजता Esplanate Court हजर केले जाणार आहे. तसेच या प्रकरणी सात जणांसह आणखी तीन जणांना ही अटक केली आहे. त्यात शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि झहीद यांची नावे असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले आहे. (Sushant Singh Rajput Case: शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना NCB कोठडी सुनावल्यानंतर अंकिता लोखंडे ने दिली अशी प्रतिक्रीया View Tweet)

Tweet:

दीपेश सावंत याला ड्रग्जची खरेदी आणि त्यातील त्याचा सहभाग असल्याने अटक केली आहे. तसेच दीपेशला डिजिटल पुराव्यांसह जबाब दिल्याच्या आधारे ताब्यात घेतले आहे. उद्या सकाळी त्याला 11 वाजता कोर्टात हजर केले जाणार आहे. (Sushant Singh Rajput Death: सुशांंत सिंह राजपूत ने स्वतः एका मुलाखतीत Claustrophobia असल्याची दिली होती कबुली, पहा हा Viral Video)

Tweet:

 

दरम्यान, सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी सुशांतचा खून झाला असल्याची शंका उपस्थित केली आहे. विकास सिंह म्हणाले आहेत की, या प्रकरणात आतापर्यंत आम्ही आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता, पण आता आम्हाला वाटते की सुशांतचा खून झाला आहे. सुशांत प्रकरणात सीबीआय आत्महत्येच्या प्रकरणातून चौकशी करत आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याची शंका सुशांतच्या कुटुंबालाही असल्याचे सिंह यांनी सांगितले आहे.