Sushant Singh Rajput Death: सुशांंत सिंह राजपूत ने स्वतः एका मुलाखतीत Claustrophobia असल्याची दिली होती कबुली, पहा हा Viral Video
Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

अभिनेता सुशांंत सिंंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्युनंंतर बॉलिवूड च्या नेपोटिझम पासुन ते मानसिक नैराश्यापर्यंत अनेक प्रश्नांंना तोंड फुटले आहे. सुशांत च्या मृत्युसाठी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakrobarty) हिला सुद्धा सुशांंत च्या फॅन्स ने दोषी धरले आहे. मात्र अद्याप याबाबत कायदेशीर निर्णय झालेला नाही. दरम्यान रियाने अलिकडे एका वृत्त वाहिनी ला मुलाखत देत आपली बाजु वेगळ्या पद्धतीने मांंडण्याचा प्रयत्न केला होता. या मुलाखतीत रियाने सुशांत ला क्लॉस्ट्रोफोबिया (Claustrophobia) असल्याचे सांंगितले होते, यामुळेच सुशांत अगदी विमानात बसताना सुद्धा काहीतरी गोळ्या औषधंं घ्यायचा असेही तिने म्हंंटले होते, अर्थात या दाव्यानंंतर पुन्हा एकदा रिया ट्रोल झाली, अनेकांंनी सुशांंतचे पॅराग्लायडिंंग करतानाचे, विमानातील फोटो व्हिडिओ सुद्धा शेअर केले मात्र आता आणखीन एका मुलाखतीचा व्हिडिओ समोर येत आहे, ज्यात स्वतः सुशांतनेच आपल्याला Claustrophobia असल्याचे म्हंंटलेले दिसतेय.

Sushant Singh Rajput Case: CBI चौकशीसाठी घराबाहेर पडणाऱ्या रिया चक्रवर्ती हिला मिळणार पोलिस सुरक्षा

झी वृत्त वाहिनीच्या Look Whose Talking With Niranajn Iyengar या कार्यक्रमातील हा व्हिडिओ आहे. या कार्यक्रमात नोव्हेंंबर 2015 मध्ये सुशांत पाहुणा म्हणुन आला होता यावेळी त्याने गप्पा मारतानाच आपल्याला क्लॉस्ट्रोफोबिया असल्याचे म्हंंटले होते, इतकेच नाही तर यामुळेच आपण दोन तासांंहुन अधिक झोपुही शकत नाही असेही सुशांत बोलताना दिसत आहे.

सुशांंत सिंंह राजपूत व्हायरल व्हिडिओ

दरम्यान, आज सुशांतची बहिण किर्ती सिंह (Kirti Singh) हिने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रिया चक्रवर्ती च्या नावे ड्रग चॅटिंगचे काही स्क्रीनशॉट शेअर केले होते. सध्या दोन दिवसांंपासुन रिया ची सीबीआय चौकशी सुरु आहे या प्रकरणात सीबीआय कडुन ठाम निर्णय आलेला नाही त्यामुळे तोवर कोणत्याही अफवांंवर विश्वास ठेवु नये असेही सांंगण्यात येत आहे.