Sushant Singh Rajput Case: अभिनेत्री Rhea Chakraborty ला घेऊन NCB अधिकारी मुंबई च्या भायखळा कारागृहात दाखल
Rhea Chakraborty | Photo Credits: Twitter/ ANI

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये रोज नवे खुलासे आणि वळणं समोर येत आहेत. काल सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) ला मुंबई मध्ये ड्रग्ज कनेक्शनमध्ये एनसीबी (Narcotics Control Bureau) कडून NDPS Act अंतर्गत अटक झाल्यानंतर आज तिला घेऊन एनसीबी अधिकारी मुंबई मध्ये भायखळा कारागृहात ( Byculla Jail) आले आहेत. दरम्यान काल तिचा जामीन अर्ज फेटाळत कोर्टाने 14 दिवसांची न्यायालनीन कोठडी ठोठावली आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये रिया सोबतच तिचा भाऊ आणि सुशांतच्या स्टाफला देखील एनसीबीने ताब्यात घेतले आहे.

रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे यांनी काल तिच्या अटकेनंतर प्रतिक्रिया देताना, ' एका व्यसनाधीन आणि मानसिक आजराशी झुंजणार्‍या माणासाने आतमहत्या केली आणि त्याच्या प्रेमात रिया होती ही तिची चूक' असं म्हटलं आहे. सोबतच तिच्या मागे 3 केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला आहे. मात्र लवकरच रिया यामधून बाहेर येईल असं म्हटलं आहे.

भायखळा कारागृहामध्ये रिया चक्रवर्ती

14 जून दिवशी सुशांत सिंह राजपूतने वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर उमद्या कलाकाराने अशाप्र्कारे जीवन का संपवलं यावरून अनेक चर्चा, आरोप-प्रत्यारोप रंगले आहे. सध्या ईडी, एनसीबी आणि सीबीआय या तीन केंद्रीय तपास यंत्रणा सुशांतच्या मृत्यूचं गूढ उकलण्यासाठी काम करत आहेत. दरम्यान सुशांतच्या आत्महत्येनंतर राजपूत कुटुंब आणि रिया चक्रवर्ती यांच्यमध्ये एकमेकांवर आरोप-प्रतुआरोपाच्या फैरी झाडल्या आहेत. दोघांनीही एकमेकांविरूद्ध  आपाल्या तक्रारी पोलिस स्थानकामध्ये दाखल केल्या आहेत.

दरम्यान रियाच्या अटकेनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी तिच्या मागे उभे राहिले आहेत. जस्टीस फॉर रिया म्हणत सोशल मीडीयात अनेकांनी रियाला पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये अनुराग कश्यप, विद्या बालन यांचा समावेश आहे.