S P Balasubrahmanyam (PC - Facebook)

ज्येष्ठ गायक एस पी बालसुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam)  यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले आहे. कोव्हिड 19 च्या आजाराने त्यांची प्रकृती खालवली होती. त्यांनी कोरोनावर मात करूनही प्रकृती न सुधारल्याने त्यांची तब्येत मागील काही दिवसांमध्ये खालावत होती. अखेर त्यांनी आज (25 सप्टेंबर) चैन्नई मध्ये खाजगी रूग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. 90 च्या दशकामध्ये 'सलमान खान'चा आवाज म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. बॉलिवूड सोबतच त्यांनी देशभरामध्ये अनेक प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. SP Balasubrahmanyam Dies: लता मंगेशकर, रितेश देशमुख, सुप्रिया सुळे यांच्यासह चाहत्यांकडून एस पी बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली!

5 ऑगस्ट पासून एस पी बालसुब्रमण्यम चैन्नई च्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल होते. कालपासूनच त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. त्यानंतर सलमान खान याने त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करण्यासाठी ट्वीट केले होते मात्र त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.  SP Charan या बालसुब्रमण्यम यांच्या मुलाने त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. आज दुपारी 1 वाजून 4 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास  घेतला.

एस पी बालसुब्रमण्यम यांचे निधन

दरम्यान, एस पी बालासुब्रमण्यम यांनी तेलगू, तामिळ, कन्नड, हिंदी, मल्याळम अशा चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी 16 भारतीय भाषांमध्ये 40,000 पेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड करणारे ते विक्रमवीर गायक ठरले आहेत. त्याची गिनिज बूक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद आहे. बालासुब्रमण्यम यांना त्यांना 6 वेळा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला आहे. त्यांना 2001 मध्ये पद्मश्री आणि 2011 मध्ये पद्मभूषण किताबानं गौरविण्यात आलं आहे.