SP Balasubrahmanyam Dies: लता मंगेशकर, रितेश देशमुख, सुप्रिया सुळे यांच्यासह चाहत्यांकडून एस पी बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली!
SP Balasubramanyam (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम असलेले गायक, अभिनेते एस पी बालसुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam ) यांचे आज निधन झाले आहे. हिंदी सह भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये आपल्या आवाजाने गारूड निर्माण करणारे एस पी बालसुब्रमण्यम यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. दरम्यान अतिशय मितभाषी आणि नम्र स्वभावाच्या हरहुन्नरी गायकाची प्राणज्योत मालवली ही त्यांच्या चाहत्यांसह, सह कलाकारांना व्यथित करणारी बातमी आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच भारताची गानकोकिळा लता मंगेशकर, बॉलिवूड कलाकार अक्षय कुमार, रितेश देशमुख यांच्यासोबतच राजकारणी सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, खासदार अमोल कोल्हे यांनी आपली श्रद्धांजली सोशल मीडियावर अर्पण केली आहे.

80-90 च्या दशकात एस पी बालसुब्रमण्यम यांनी आपल्या आवाजाने बॉलिवूडला वेड लावले होते. अभिनेता सलमान खान याच्या 90 दी मधील अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले होते. सलमान साठी एस पी बालसुब्रमण्यम यांनी पहिल्यांदा फिल्म 'हम आपके है कौन मध्ये‘पहला पहला प्यार है’ गायलं ते लोकांना प्रचंड आवडलं. पुढे त्यांचा प्रवास सुरू राहिला. शाहरूख खानच्या चैन्नई एक्सप्रेसमध्ये त्यांनी टायटल ट्रॅक गायला आहे.

लता मंगेशकर ट्वीट

रितेश देशमुख ट्वीट

सुप्रिया सुळे ट्वीट

अमोल कोल्हे ट्वीट

दरम्यान, एस पी बालासुब्रमण्यम यांनी तेलगू, तामिळ, कन्नड, हिंदी, मल्याळम अशा चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी 16 भारतीय भाषांमध्ये 40,000 पेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड करणारे ते विक्रमवीर गायक ठरले आहेत. त्याची गिनिज बूक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद आहे. बालासुब्रमण्यम यांना त्यांच्या उत्कृष्ट गायकी कारकीर्दीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.