कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) एक नवा चेहरा पाहायला मिळाला. मागील वर्षी आलेल्या कोरोना व्हायरस संकटात गरिब-गरजूंना मदत करण्याचे काम सोनू सूद करत होता. यंदा दुसऱ्या लाटेतही त्याचे मदतकार्य सुरुच आहे. त्यामुळे अभिनेता अनेकांसाठी देवदूत ठरत आहे. हजारो-लाखो लोकांपर्यंत आपली मदत पोहचवून अभिनेत्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. अनेक स्तरातून त्याच्या कामाचे कौतुक होत आहे. अशातच राखी सावंतने देखील सोनू सूद च्या कामाची प्रशंसा करत त्याला देशाचा पंतप्रधान बनवण्याचे आवाहन केले आहे.
यावरुनच सोनू सूद याला पंतप्रधान बनवण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सोनूने दिलेले उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सोनूने घरी आलेल्या मीडियातील लोकांना बाहेर येऊन सरबत दिले. तेव्हा त्याला पंतप्रधान बनवण्याविषयी विचारण्यात आले. तेव्हा सोनू म्हणाला, "जो जिथे आहे तिथे ठीक आहे. ते आपले काम नाही. निवडणूक लढण्यासाठी भाई लोक उभे आहेत. मग मी काय करु निवडणूक लढवून. सोनूच्या या उत्तराने अनेकांची मने जिंकली आहेत." (Sonu Sood चे सरकारला खास अपील, कोरोनामुळे आई-वडिलांना गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे)
पहा व्हिडिओ:
View this post on Instagram
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वेगाने वाढली. त्यामुळे रेमडेसिवीर, ऑक्सिजन, रुग्णालयातील बेड याची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासू लागली. आरोग्य सुविधांच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. यात संपूर्ण कठीण काळात सोनूने कोणताही भेदभाव न करता मदत केली.