Sonu Sood (Photo Credits: Facebook)

देशभरात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्याचसोबत मृतांचा आकडा ही वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. काही लोक आपल्या नातेवाईकांची मदत करण्यासाठी पुढे येताना दिसून येत आहेत. अशातच अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) हा लोकांना सध्याच्या परिस्थितीत रुग्णालयात बेड मिळवून देणे ते त्यांच्या खाण्यापिण्याची सोय उपलब्ध करुन देत आहे. याच पार्श्वभुमीवर आता सोनू याने सरकारला खास अपील केले आहे. त्याने असे म्हटले आहे की, ज्यांनी या कोरोनाच्या महासंकटात आपल्या आई-वडिलांना गमावले त्यांच्या मुलांना सरकारने मदत करावी.(मुंबई विमानतळावर मदत मागणाऱ्या व्यक्तीला Sonu Sood ने दिले 'हे' उत्तर Watch Video) 

सोनू सूद याने पुढे असे म्हटले की, ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावले तर काही प्रकरण अशी आहेत 10-12 वर्षांच्या मुलांनी तर आपल्या पालकांना गमावले आहे. त्यामुळे त्यांचे भविष्य आता चिंतेत आहे. सोनूने अशा लोकांकडे अपील केले आहे जे या मुलांची मदत करण्यास सक्षम आहेत. त्याचसोबत सोनू सूद याने राज्य आणि केंद्र सरकारला सुद्धा अशा मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी अपील केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

केंद्र आणि राज्य सरकारला सांगू इच्छितो की त्यांनी अशा मुलांना त्यांना जेथे शिकायचे आहे तेथे मोफत शिक्षण द्यावे. पालकांना गमावल्यामुळे त्या मुलांना शाळा किंवा महाविद्यालय असो त्यांना जर खासगी संस्थेत शिकायचे असल्यास ते सुद्धा मोफत उपलब्ध करुन द्यावे असे सोनू याने म्हटले आहे.(Gautam Gambhir च्या संस्थेला Akshay Kumar ने केली मोठी मदत; कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी दिले 1 कोटी रुपये)

सोनूने असे ही म्हटले की, काही परिवाराने आपला कर्ताधर्ता गमावला आहे. त्यामुळे अशी सिस्टिम असावी की जी त्यांची मदत करेल. या व्हिडिओ शेअर करत असे म्हटले की, अशा प्रत्येक व्यक्तीच्या सोबत राहण्याची गरज आहे ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावले आहे. दरम्यान, गेल्या वर्षात जेव्हा कोरोनाचे महासंकट आले तेव्हा ही सोनू याने प्रवासी मजूरांना घरी पाठवण्याची व्यवस्था केली होती.