Simmba Song Tere Bin: सिम्बा सिनेमातील 'तेरे बिन' या नव्या गाण्यात रणवीर-साराचा रोमांटिक अंदाज!
'सिम्बा' सिनेमातील नवे गाणे 'तेरे बिन...' (Photo credit: YouTube)

Simmba Song Tere Bin:  रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांचा बहुचर्चित सिनेमा 'सिम्बा' (Simmba) मधील अजून एक नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'आंख मारे' या धमाकेदार गाण्यानंतर 'तेरे बिन नही जिना मर जाना' हे नवे रोमांटिक गाणे प्रदर्शित झाले आहे. यात आपल्याला रणवीर-साराचा (Sara Ali Khan) रोमांटिक प्रवास पाहायला मिळणार आहे. पाहा व्हिडिओ : सिम्बातील 'आंख मारे' हे गाणे

'आंख मारे' हे गाणे अरशद वार्सीच्या 'तेरे मेरे सपने' या सिनेमातील गाण्याचा रिमेक होता. त्यानंतर दुसरे गाणे देखील अजय देवगनच्या 'कच्चे धागे' सिनेमातील 'तेरे बिन नही जिना मर जाना' या गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन आहे. या सिनेमात हे गाणे अजय देवगण आणि मनिषा कोईराला यांच्यावर चित्रित झाले होते. पाहा- सिनेमाचा ट्रेलर

या गाण्याचा रिमेक तनिष्क बाची (Tanishk Bagchi) यांनी केला असून राहत फते अली खान (Rahat Fateh Ali Khan) आणि असिस कौर (Asees Kaur) यांनी त्यावर स्वरसाज चढवला आहे. त्याचबरोबर गाण्यात सारा आणि रणवीरचा रोमांटिक अंदाज पाहायला मिळतो. त्यामुळे गाणे श्रवणीय आणि प्रेक्षणीय झाले आहे. Simmba Teaser : रणवीरची जबरदस्त अॅक्शन ; चाहत्यांसाठी पर्वणी

तुम्हीही पाहा....

अजय देवगण आणि मनिषा कोईरालावर चित्रित झालेले गाणे...

'सिम्बा'  हा बहुचर्चित सिनेमा 28 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.