Simmba Trailer: इमानी पोलीस वर्दीतील 'सिम्बा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
सिम्बा चित्रपट (फोटो सौजन्य- यू ट्यूब)

रोहित शेट्टी(Rhoit Shetty) दिग्दर्शित बहुचर्चित बॉलिवूड अॅक्शन चित्रपट (Action Movie) 'सिम्बा'(Simmba) हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर नुकतान प्रदर्शित करण्यात आला असून तो प्रेक्षकांच्या खूप पसंदीस पडला आहे. तर या चित्रपटात स्टारकीड सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.

'सिम्बा' या चित्रपटात रणवीर सिंग (Ranveer Singh)  याचा पोलीस वर्दीतील खास अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच चित्रपटातील रणवीरचा लुक हा सिंघम सारखा दिसून येत आहे. तर चित्रपटातील अॅक्शन सीन ही पाहण्याजोगे आहेत. अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) या चित्रपटातून नकारात्मक व्यक्तीरेखा साकारणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर (Karan Johar)  करणार असून रोहित शेट्टीने याचे दिग्दर्शन केले आहे. तर सैफ अली खान(Saif Ali Khan)ची मुलगी सारा अली खान(Sara Ali Khan) प्रथमच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. येत्या 28 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी फारच उत्सुकता दिसून येत आहे.

'सिम्बा' या चित्रपटाची निर्मिती साऊथच्या 'टेम्पर' या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्यात आला आहे. रणवीर सिंगच्या लूक बद्दल सांगायचे झाले तर त्याची तुलना अनिल कपूर(Anil Kapoor) यांचा चित्रपट 'मिस्टर आझाद' मधील लूकशी केली जात आहे.