Simmba Song Aankh Marey: पाहा Ranveer-Sara चे जबरदस्त डान्स मूव्ह्ज आणि गोलमाल गँगची धमाल
सिम्बा सिनेमातील गाणे आँख मारे (Photo Credits: Youtube)

Simmba Song Aankh Marey: रोहीत शेट्टी दिग्दर्शित आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) -सारा अली खान (Sara Ali Khan) स्टारर सिम्बा (Simmba) सिनेमातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'आंख मारे' (Aankh Marey) असे या गाण्याचे बोल असून 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तेरे मेरे सपने' या सिनेमातील गाण्याचे रिमिक्स व्हर्जन आहे. गाण्यात सारा अली खान आणि रणवीर सिंगची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळते. Simmba Teaser : रणवीरची जबरदस्त अॅक्शन ; चाहत्यांसाठी पर्वणी

करण जोहर, (Karan Johar) सारा अली खान आणि रणवीर सिंग यांच्या शिवाय गोलमाल गँगने गाण्यात धमाल केली आहे. गाण्यात अरशद वारसी  (Arshad Warsi), तुषार कपूर (Tusshar Kapoor), श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि कुणाल खेमू (Kunal Khemu) यांनी रंगत भरली आहे. पाहा सिनेमाचा ट्रेलर- व्हिडिओ

नेहा कक्कड (Neha Kakkar), मीका सिंग (Mika Singh) आणि कुमार सानू (Kumar Sanu) यांनी हे गाणे गायले आहे.

पाहा सिम्बामधील हे धमाल गाणे-

सारा अली खानचा हा दुसरा सिनेमा असून तिची डेब्यू फिल्म 'केदारनाथ' 7 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर 'सिम्बा'  हा बहुचर्चित सिनेमा 28 डिसेंबरला प्रेक्षागृहात धडकणार आहे.