Simmba Teaser : रणवीरची जबरदस्त अॅक्शन ; चाहत्यांसाठी पर्वणी
सिम्बा सिनेमातील रणवीर सिंग (Photo credits: Twitter)

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी सिनेमा 'सिम्बा'चा टीझर प्रदर्शित झाला आहे. रणवीर सिंग आणि रोहीत शेट्टीच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी असणार आहे. टीझरमध्ये रणवीर सिंग आपल्याला बिनधास्त, बेधडक, निडर पोलिस इन्सफेक्टरच्या रुपात दिसतो.

टीझर थोडा गोंधळ उडवणारा असला तरी हा सिनेमा मात्र जबरदस्त असेल, यात शंका नाही. टीझरवरुन रोहीत शेट्टीचा सिनेमा असल्याचे तात्काळ कळते. कारण यात जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे.

तुम्हीही पाहा सिम्बा सिनेमाचा टीझर-

टीझरमध्ये अभिषेक बच्चन आणि रोहीत शेट्टीचीही झलक पाहायला मिळते. या सिनेमात अभिषेक बच्चन नेगेटीव्ह भूमिका साकारावी, यासाठी रोहीतने त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पण 'रावण' सिनेमातील अभिषेकची नेगेटीव्ह भूमिका चाहत्यांच्या पसंती न पडल्याने त्याने रोहीताला नकार दिला. त्यानंतर रोहीतने नेगेटीव्ह भूमिकेसाठी सोनू सुदला पसंती दिली. 28 डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.