Jabariya Jodi Trailer: परिणीति चोपड़ा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची फनी केमिस्ट्री असलेला 'जबरिया जोडी' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
Jabariya Jodi trailer (Photo Credits: YouTube/Balaji Motion Pictures)

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि परिणीति चोपड़ा (Parineeti Chopra) या जोडीचा नवा सिनेमा 'जबरिया जोड़ी' (Jabariya Jodi) चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. 'हंसी तो फंसी' या सिनेमानंतर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.

ट्रेलरमध्ये आपल्याला परिणीति आणि सिद्धार्थची फनी केमिस्ट्री पाहायला मिळते. सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा अभय सिंह ही व्यक्तीरेखा साकारत असून परिणीति चोपड़ा बबली या भूमिकेत दिसणार आहे. जबरदस्त कॉमेडीने नटलेला हा सिनेमा प्रेक्षकांची मने जिंकेल, अशी आशा आहे.

पहा ट्रेलर:

सिनेमात सिद्धार्थ एका बिहारी व्यक्तीची भूमिका साकारत आहे. परिणीति आणि सिद्धार्थ शिवाय या सिनेमात अपारशक्ति खुराना आणि संजय मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यात अपारशक्ति परिणीति चोपड़ाच्या मित्राची तर संजय मिश्रा तिच्या वडीलांच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन प्रशांत सिंह याने केले आहे. तर निर्मितीची सूत्रं एकता कपूर सांभाळत आहे. हृतिक रोशनच्या 'सुपर 30' सिनेमाशी होणारी टक्कर टाळण्यासाठी एकता कपूरने सिनेमाची रिलिज डेट बदलण्याचा निर्णय घेतला असून आता हा सिनेमा 2 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.