Drishyam 2 ची शुटिंग सुरू होणार नाही; निर्मात्याने उच्च न्यायालयात दिलं 'हे' आश्वासन
Drishyam 2 (PC - Twitter)

‘दृश्यम 2’ (Drishyam 2) चित्रपट निर्माता कंपनी पॅनारोमा स्टूडियो इंटरनेशनल ने दृश्यम 2 च्या हिंदी रिमेकचा हक्क मिळविला होता. आता त्यांनी मुंबई हायकोर्टाला आश्वासन दिले आहे की, कॉपीराइट प्रकरण संपेपर्यंत आपण चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार नाही. व्हायकॉम 18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने गेल्या आठवड्यात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यामुळे पॅनोरामा स्टुडिओ इंटरनॅशनलला हिंदीमध्ये दृश्यम 2 बनवण्यापासून रोखण्याची विनंती केली होती. व्हायकॉम 18 ने याचिकेत आरोप केला आहे की, हा कॉपीराइट उल्लंघनाचा मुद्दा आहे. त्यांना फक्त दृश्यम 2 वर चित्रपट बनविण्याचा अधिकार आहे.

बुधवारी न्यायाधीश गौतम पटेल यांनी या खटल्याची सुनावणी केली आणि व्हायकॉम अर्जावर कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, 'पॅनोरामा यापुढे कोणाकडून किंवा स्वत: च्या मदतीने चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार नाही.' त्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 जून रोजी होणार आहे. व्हायकॉमने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, त्यांनी 2017 मध्ये वाइड एंगल क्रिएशन आणि राजकुमार थिएटर प्रायव्हेट लिमिटेड पॅनोरामा यांच्या रीमेकसाठीच्या अधिकार करारावर स्वाक्षरी केली आहे. दृश्यम चित्रपटात हिंदी विभागात अजय देवगणची महत्वाची भूमिका होती. या चित्रपटाला चांगली पसंती मिळाली होती. (वाचा - Virat Kohli-Anushka Sharma च्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला मिळाले मोठे यश, 24 तासांच्या आत जमा झाले 3.6 कोटी रुपये)

 

View this post on Instagram

 

A post shared by Socio Legal Corp (@sociolegalcorp)

दरम्यान, आतापर्यंत अजय देवगन बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अजय देवगनच्या चित्रपटांना खूपचं पसंती मिळाली आहे. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत चांगले नाव कमवले आहे.