Shilpa Shetty Dance In Ganpati Visarjan: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ने गणपती विसर्जनावेळी पती राज कुंद्रा आणि मुलासोबत केला डान्स; पहा व्हिडिओ
Shilpa Shetty (Photo Credits: Instagram)

Shilpa Shetty Dance In Ganpati Visarjan: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ने रविवारी आपल्या घरी विराजमान झालेल्या दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले. यावेळी तिने विसर्जन मिरवणूकीत आपले पती राज कुंद्रा आणि मुलासोबत डान्स केला. सध्या सोशल मीडियावर शिल्पाचा हा डान्स व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, शिल्पाने तसेच तिच्या परिवाराने गणपती विसर्जनासाठी पारंपरिक कपडे परिधान केले होते. शिल्पा या कपड्यांमध्ये खूपचं सुंदर दिसत होती. वूंम्प्लाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शिल्पाचे गणपती विसर्जन करतानाचे व्हिडीओ तसेच काही फोटो शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये शिल्पा पती आणि मुलासोबत डान्स करताना दिसत आहे. (हेही वाचा -Kaun Banega Crorepati 12: Amitabh Bachchan यांची कोरोनावर मात केल्यानंतर पुन्हा शूटिंगला सुरूवात; शेअर केली खास पोस्ट)

यंदा गणेशोत्सवावर कोरोना विषाणूचं सावट आहे. त्यामुळे अनेक सिलेब्रिटिंनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून गणरायाचं विसर्जन केलं. शिल्पाने गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर तेथे उपस्थित फोटो ग्राफ्रर्संना स्वत: प्रसादाचे वाटप केले. शिल्पाच्या वर्कफ्रन्ट बद्दल बोलायचं झालं तर ती, तब्बल 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. शिल्पा ‘हंगामा 2’ आणि ‘निकम्मा’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारणार आहे.