Gautami Patil: उदगीर येथे गौतमी पाटील हीच्या कार्यक्रमात प्रेक्षकांचा तुफान राडा, प्रेक्षकाच्या डोक्याला दगडाचा मारा
Gautami Patil | (Photo credit: archived, edited, representative image)

Gautami Patil: लावणी कलाकार गौतमी पाटील (Gautami Patil) हीच कार्यक्रमात तरुणाला दगड लागल्याची माहिती समोर आली आहे. गौतमीच्या कार्यक्रमात सतत तरुणांचा राडा, गोंधळ असल्यामुळे तरुणाला मार लागला आहे.  मागिल काही कार्यक्रमात तरुणांची हुल्ल़डबाजी पाहून पोलिसही चक्रावले होते. तर काही दिवसापूर्वी उदगीर (Udgir) येथे कार्यक्रमात तरुणाला दगड लागल्याने जखमी झाला आहे.( हेही वाचा-  अरेरे..! गौतमी पाटील नाचता नाचता अडखळली अन स्टेजवरच पडली)

मिळालेल्या माहितीनुसार, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांनी गोंधळ निर्माण केला होता. उदगीर येथील कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे. माजी आमदार सुधाकर भालेराव आणि भाजपा जिल्हाध्यक्षांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमात तरुणांनी राडा केल्यामुळे मागे बसलेल्या तरुणांनी प्रेक्षकांना कार्यक्रम दिसत नसल्यामुळे मागून दगड मारले, दरम्यान एक दगड जोरात तरुणाला मार बसला. यात तो जखमी झाला आणि त्याला रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. औषध उपचारानंतर तरुणाच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

उदगीर येथील कार्यक्रमात तरुणांनी नेत्यांचे पोस्टर देखील फाडले होते. या कार्यक्रमात अनेत दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु होती. कार्यक्रम सुरु झाल्यानंंतर प्रेक्षकांनी गर्दी केली होती. तरुणांनी कार्यक्रमात राडा केला होता त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.