Kaun Banega Crorepati 12: Amitabh Bachchan यांची कोरोनावर मात केल्यानंतर पुन्हा शूटिंगला सुरूवात; शेअर केली खास पोस्ट
कोविड 19 वर मात केल्यानंतर आता बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) पुन्हा कामावर रूजु होण्यासाठी सज्ज झाला आहे.
कोविड 19 वर मात केल्यानंतर आता बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) पुन्हा कामावर रूजु होण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान सोमवार (24 ऑगस्ट) पासून बिग बी अमिताभ बच्चन यांनी हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय क्विझ शो ' कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati ) च्या 12 व्या सीझनला सुरूवात केली आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांनी केबीसीच्या सेट्सवरील काही क्षण शेअर केले आहेत.
दरम्यान 'कौन बनेगा करोडपती' या शोच्या 12 व्या सीझनसाठी शूटिंग सुरू झाले आहे. यामध्ये बीग बींच्या फोटोत युनीट निळ्या रंगाच्या पीपीई सूट मध्ये दिसत आहे. Amitabh Bachchan tested Negative for COVID: कोरोना व्हायरसवर मात केल्यानंतर घरी परतले, ट्वीट करत चाहत्यांचे मानले आभार.
अमिताभ बच्चन यांची पोस्ट
2000 साली टेलिव्हिजनवर केबीसीला सुरूवात झाली. मागील 20 वर्षात केबीसीचे 11 सीझन झाले आहेत. तर 12व्या सीझनसाठी आता शुटिंग सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान बी यांना जुलै महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. बच्चन कुटुंबामध्ये 4 जण कोरोनाच्या विळख्यात होते. मुंबईच्या नानावटी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार झाले. आता बॉम्बे हाय कोर्टाने देखील 60 वर्षाच्या पलिकडील कलाकारांना पुरेशी काळजी घेत कामावर परतण्याचा मार्ग खुला केला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 24, 2020 12:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

