Amitabh Bachchan tested Negative for COVID: कोरोना व्हायरसवर मात केल्यानंतर घरी परतले, ट्वीट करत चाहत्यांचे मानले आभार
अमिताभ बच्चन (Photo Credits: Instagram)

Amitabh Bachchan COVID-19 Report Negative gets Discharged from Hospital: बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेते आणि बिग बी म्हणून ओळख असणारे अमिताभ बच्चन यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे अमिताभ यांना नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर ते आता आपल्या घरी परतले आहेत. जवळजवळ 22 दिवसानंतर अमिताभ बच्चन यांनी कोरोनाच्या विरोधात लढा दिल्यानंतर ते कोरोनामुक्त झाले आहेत.(Amitabh Bachchan Tests Negative For Coronavirus: अमिताभ बच्चन यांची कोरोना विषाणू चाचणी आली निगेटिव्ह; आता घरीच करणार आराम, जाणून घ्या आजच्या दिवसाचे 'कुली अपघाताशी' असलेले कनेक्शन)

कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर अमिताभ यांनी त्यांच्या चाहत्यांना याबाबत ट्वीट करत खुशखबर दिली आहे. त्याचसोबत त्यांनी हात जोडून अभिवादन करत असे ही म्हटले आहे की, माझी आज कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मी स्वत:ला घरात क्वारंटाइन करुन घेतले आहे. देवाची कृपा आणि आई-वडीलांचे आशीर्वाद, जवळचे सर्वजण आणि चाहत्यांच्या दुवा सुद्धा मला लाभल्या. नानावटी रुग्णालयातील नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुद्धा माझी उत्तम काळजी घेतली. त्यांच्यामुळेच मी आजचा दिवस पाहू शकत आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांची प्रकृती सुधारल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. अमिताभ यांनी ही खुशखबरी दिल्यानंतर चाहत्यांना आनंद झाला आहे. तसेच अद्याप अभिषेक बच्चन याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच चाहत्यांकडून अभिषेक याची प्रकृतीत लवकर सुधार होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.