टीव्ही सुपरस्टार 'सिद्धार्थ शुक्लाच्या' (Siddharth Shukla) अचानक जाण्याने त्याचा प्रत्येक चाहता दु:खी झाला होता. नुकताच तो त्याच्या कारकिर्दीच्या उंचीकडे वाटचाल करत असताना त्याचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या जाण्यानंतर त्याची गर्लफ्रेंड 'शहनाज गिल' (Shehnaaz gill ) गप्प बसू लागली होती. ती सोशल मीडियावर फारशी अॅक्टिव्हिटी होती ना मीडियात. ती पूर्णपणे तिच्याच विश्वात हरवून गेली होती. आता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर ५६ दिवसांनी शहनाजची पहिली इंस्टाग्राम पोस्ट आली आहे. ही पोस्ट सिद्धार्थच्या चाहत्यांना भावूक करणारी आहे. (हे ही वाचा Sidharth Shukla Passes Away: सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज गिल पुर्णपणे खचली, प्रकृतीबाबत वडिलांनी दिली प्रतिक्रिया.)
पोस्ट शेअर करुन दिली महिती
शहनाज गिलने इंस्टाग्रामवर एक पोस्टर शेअर केली आहे. ज्यामध्ये ‘तू इथे आहेस’ असे लिहिले आहे. सिद्धार्थ शुक्ला यांला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. या फोटोमध्ये शहनाज सिद्धार्थसोबत हसताना दिसत आहे. हे चित्र सिद्धार्थ आणि शहनाजच्या बिग बॉसच्या दिवसांची आठवण करून देणारे आहे.
View this post on Instagram
शहनाज गिल सिद्धार्थ शुक्ला यांच्या स्मरणार्थ काहीतरी खास घेऊन येणार आहे जी उद्या दुपारी 12 वाजता लोकांच्या भेटीला येणार आहे. ही श्रद्धांजली काय आहे हे आतापर्यंत कोणालाही माहित नाही, परंतु असे मानले जाते की ही एक प्रकारची संगीत श्रद्धांजली असू शकते. ज्याद्वारे शहनाज गिल सिद्धार्थबद्दलच्या तिच्या भावना व्यक्त करणार आहे. शहनाजच्या या पोस्टवर तिचे आणि सिद्धार्थचे चाहते भरपूर कमेंट करत आहेत. तर सिद्धार्थचे चाहते शहनाजच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत आहे.