Sayani Gupta and Shahrukh Khan (Photo Credits-Twitter)

Sayani Gupta on Shahrukh Khan's Post:  आज 2 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (Gandhi Jayanti) साजरी केली जाते. गांधीजींच्या विचारांवर आणि त्यांच्या पावलांवर चालण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करतो. याच पार्श्वभुमीवर बॉलिवूड सेलेब्सकडून सुद्धा गांधी जयंती निमित्त सोशल मीडियात विविध मार्गाने पोस्ट केल्याचे दिसून आले. या पोस्टमधून त्यांनी गांधी जयंती निमित्त मोलाचा संदेश देण्याचा सुद्धा प्रयत्न केला. तर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने सुद्धा गांधी जयंती निमित्त एक खास फोटो शेअर केला होता. त्यात शाहरुख याने, 'वाईट बोलू नका, वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका' असा संदेश दिला होता.(Shah Rukh in Yash Chopra Biopic: प्रसिद्ध निर्माते यश चोप्रा यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये झळकणार शाहरुख खान? आदित्य चोप्रा करत आहेत चित्रपटाची प्लानिंग)

शाहरुख याने आपल्या पोस्टमधून बहुमोलाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. त्यात शाहरुख याने मुलगी सुहाना जी डोळ्यांवर हात ठेवून उभी आहे. म्हणजेच वाईट पाहू नये असा संदेश देत आहे असे दिसून येत आहे. ट्विट मध्ये शाहरुख खान याने असे लिहिले की, या गांधी जयंती निमित्त आपण आपल्या मुलांना अशा काही गोष्टी शिकवू पाहतो किंवा सांगतो ज्या त्यांच्यासाठी चांगल्या-वाईट काळासाठी उपयोगी पडतील. त्यानंतर आता शाहरुख याची ही पोस्ट सुहाना हिने तिच्या वर्णभेदावरुन केलेल्या पोस्टवरुन केल्याच्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे.

आता शाहरुख याची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर Four More Shots Please! मधील अभिनेत्री सयानी गुप्ता हिने त्याच्यावर खोचक टीका केली आहे. सयानी गुप्ता हिने ट्विट करत शाहरुखवर निशाणा साधला आहे. तिने असे म्हटले आहे की, खरे बोलण्यास शिका. पीडितांसाठी आवाज उठवा, दलित बंधु-भगिनींच्या हक्कांसाठी बोलले पाहिजे. तर आपले डोळे-कान बंद ठेवू नये.(Gandhi Jayanti, Lal Bahadur Shastri Jayanti 2020 निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांचे ट्विटच्या माध्यमातून विनम्र अभिवादन!)

सयानी गुप्ती हिने आपल्या पोस्टच्या माध्यमातून थेट शाहरुख खान याच्या शांततेवर प्रश्न उपस्थितीत केले आहेत. तिने आपल्या ट्विट मध्ये शाहरुख याला टॅग सुद्धा केले आहे. कारण त्याने पोस्टमध्ये दलित शब्दाचा वापर केला आहे. यावरुन असे समजते की, हाथरस प्रकरणावरुन शाहरुखने धरलेल्या मौनावरुन ती नाराज आहे. तिच्या दृष्टीकोनातून अशा मुद्द्यांवर उघडपणे बोलले पाहिजे आणि पीडितांचा आधार बनले पाहिजे. सोशल मीडियात लोकांकडून या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत.