सारा अली खान हिने घेतला देवी कामाख्याचा आशीर्वाद पण नेटकऱ्यांनी धर्मावरुन उपस्थितीत केले प्रश्न
Sara Ali Khan (Photo Credits-Instagram)

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान  (Sara Ali Khan)हिला फिरण्याची खुप आवड आहे. त्या संदर्भातील फोटो सुद्धा ती नेहमीच शेअर करत असते. अशातच नुकतीच सारा ही आसाम मधील देवी कामाख्याच्या दर्शनासाठी गेली होती. तेथील फोटो सारा हिने सोशल मीडियात पोस्ट केले आहेत. साराने सफेद रंगाचा सूट आणि ट्रेडिशनल स्कार्फ घेतल्याचे फोटो मध्ये दिसून येत आहे. या लूकमध्ये सारा अत्यंत शान दिसत आहे. मात्र नेटकऱ्यांनी साराला धर्मावरुन विविध प्रश्न विचारले आहेत.

सारा हिने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये शांति, आभार आणि आशीर्वाद असे लिहिले आहे. सारा हिच्यासोबत आणखी एक मुलगी सुद्धा दिसून येत आहे. सारा हिने देवी कामाख्याचे दर्शन घेतल्याने काही जणांची तिचे कौतुक केले आहे. पण काहींना तिचे मंदिरात जाणे नापसंद केले आहे. यामुळे युजर्सकडून तिच्या धर्मावरुन प्रश्न उपस्थितीत केले आहेत.(Kareena Kapoor Khan च्या छोट्या मुलाचे नाव Jeh; रणधीर कपूर यांच्याकडून शिक्कामोर्तब)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

दरम्यान, अशा पद्धतीचे प्रश्न यापूर्वी सुद्धा सारासाठी उपस्थितीत करण्यात आले आहेत. बनारस येथील गंगा आरतीसाठी उपस्थिती लावल्यानंतर सुद्धा सारा हिला ट्रोल केले होते. मुस्लिम असून मंदिरात जाणे काही लोकांना पसंद पडले नव्हते.

सारा हिचा कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने नुकतीच आनंद एल राय याच्या 'अतरंगी रे' चे शूटिंग पूर्ण केले आहे.या सिनेमात सारा, अक्षय कुमार आणि साउथ सु्परस्टार धनुष सोबत झळकणार आहे. या व्यतिरिक्त आदित्य धर यांचा 'द इमोर्टल्स ऑफ अश्वत्थामा' मध्ये ती विकी कौशलसह दिसणार आहे.