अभिनेत्री सना खान (Sana Khan) हिने बॉलिवूड जगताला अलविदा केल्यानंतर अलीकडेच ती अनस सईद याच्यासोबत लग्नबंधनात अडकली. तिने अत्यंत साधेपणाने कमी लोकांच्या उपस्थितीत हे लग्न केले. या लग्नाला तिच्या कुटूंबांतील मोजकीच माणसे होते. तिच्या लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर नुकताच तिने आपल्या हनीमूनचा व्हिडिओ शेअर केला आहे. ती आपल्या हनिमूनसाठी काश्मीरला पोहोचली असून तिथे ती आपल्या पतीसोबत छान एन्जॉय करत आहे. कश्मीरला पोहोचल्यानंतर तिने बरेच फोटोज आणि व्हिडिओज शेअर केले होते. या व्हिडिओमध्ये सना खान ने विमानतळापासून ते हॉटेलच्या रुमपर्यंतचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत.
या व्हिडिओमध्ये सना आपला पती अनससह विमानतळावर दिसत आहे. ज्यानंतर सना खानने व्हिडिओ शेअर करुन सांगितले की, हे काश्मीर असून येथील जबरदस्त नजा-याचा ती आनंद घेत आहे आणि आपल्या पतीसह छान एन्जॉय करत आहे. तुम्ही पण पाहा सना खान चा हा व्हिडिओ
हेदेखील वाचा- Sana Khan Shares First Wedding Photo: लग्नानंतर सना खानने पती अनस सय्यदबरोबर शेअर केला फोटो; Watch Photo
View this post on Instagram
सना खान लग्नानंतर सोशल मिडियावर बरीच सक्रिय दिसत आहे. कधी मेहंदी तर कधी वलीमेचे फोटो शेअर करुन ती आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. तिथे सनाचा हा अंदाज तिचे चाहतेही प्रचंड पसंत करत आहे.
लग्न करण्याच्या काही दिवसांपूर्वी सनाने आपण बॉलिवूड जगताचा रामराम ठोकला. तिने तेव्हा असे सांगितले होते की, ती आता तिच्या धर्माच्या मार्गावर चालेल. यासाठी ती शोबिजशी सुद्धा दूर राहत आहे.