सलमान खान याचा Radhe चित्रपट महाराष्ट्रातील 2 सिनेमाघरांमध्ये प्रदर्शित, पहिल्याच दिवशी विक्री झाल्या अवघ्या 84 तिकिट
Radhe Movie | (Photo Credits: Twitter)

सलमान खान (Salman Khan) आणि दिशा पाटनी (Disha Patani) यांचा चित्रपट 'राधे' (Radhe) मे महिन्याच्या 3 तारखेलाच प्रदर्शित झाला होता. पण कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे तो सिनेमाघरांमध्ये दाखवता आला नाही. मात्र आता जेव्हा लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात शिथील झाले तेव्हा हा चित्रपट महाराष्ट्रातील 2 सिनेमाघरांमध्ये दाखवला जात आहे. ऐवढेच नव्हे तर पहिल्याच दिवशी याची फक्त 84 तिकिटे विक्री केली गेली.(Salman Khan चा 'Radhe' सिनेमाची फेसबुकवर 50 रुपयांत विक्री; 3 जणांविरोधात FIR दाखल)

राधे चित्रपट प्रथम ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. मात्र आता लॉकडाउनचे नियम शिथील झाल्यानंतर फक्त लेव्हल 1 आणि लेव्हल 2 श्रेणीमध्ये येणाऱ्या शहरांमधील सिनेमागृह सुरु करण्याची परवानगी दिली आहे. यामुळेच तो आता सिनेमागृहांमध्ये दाखवला जात आहे. इंस्टाग्रामवर Zee Studio ने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये सिनेमा पाहताना काही प्रेक्षक दिसून येत आहेत.तर फोटो शेअर करत कॅप्शन असे दिले आहे की, Wanted Bhai is waiting to meet you in Malegaon!

#Radhe, now playing at Drive in Malegaon! 🚘📽️

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)

सलमानचा राधे सिनेमा मालेगाव आणि औरंगाबाद मधील सिनेप्लेक्समध्ये दाखवला जात आहे. तर मालेगावात याचे 2 शो ठेवण्यात आले आहेत. तर सिनेप्लेक्समध्ये 4 वेळा दाखवला जात आहे. एका रिपोर्ट्सनुसार, 7.30 वाजेपर्यंत शो साठी ड्राइव्ह इन सिनेमा मध्ये चित्रपट पाहण्यासाठी 22 लोक आले होते. तर 40 लोकांनी खुर्चीवर बसून सिनेमा पाहिला. सिनेमागृहाचे मॅनेजर यांनी असे म्हटले की, 9.30 वाजता ठेवण्यात आलेला शो रद्द करण्यात आला. कारण कोणीही तो पाहण्यासाठी आले नाही.