बॉलिवूडचा (Bollywood) भाईजान सलमान खान (Salman Khan) याने पुन्हा एकदा कोरोनाविरुद्ध लढ्यात आपले योगदान दिले आहे. काही दिवसांपूर्वी मालेगाव (Malegaon) मधील महिला मजुरांनी लॉक डाऊन (Lock Down) काळात आपल्याला रेशन मिळत नसल्याचे सांगितले होते, त्यांच्या या तक्रारीला तात्काळ प्रतिसाद देत सलमान खान याने आपल्या टीमच्या हस्ते मालेगाव मध्ये 50 महिलांना किराणा पोहचवला आहे. या महिला रोजंदारीचे काम करतात मात्र लॉक डाऊन काळात त्यांचे काम बंद असल्याने आणि आता लॉक डाऊन लागू होऊनही बराच काळ झाल्याने त्यांच्या खाण्यापिण्याची सोय होत नव्हती. अशावेळी त्यांनी भाईजान सलमान ला मदतीची हाक दिली होती असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हंटले जात आहे. Coronavirus: बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याच्याकडून मुंबई महानगरपालिकेला 3 कोटींची मदत
दुसरीकडे मुंबईत सुद्धा सलमानच्या टीमतर्फे गरजू आणि गरिबांना किराणा वाटप करण्यात आले, याबाबत बाबा सिद्दीकी यांनी ट्विटच्या माध्यमातून माहिती देत सलमानचे आभार मानले होते. तसेच यापुरवही सलमान खान ने पीएम- केअर्स फंड, मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये आपल्या परीने योगदान केले आहे. सिनेक्षेत्रातील मजुरांच्या तब्बल 25 हजार कुटुंबाना त्याने आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती, लॉकडाऊनमुळे सलमान खानने 'सलमान खान फिल्म्स' आणि 'सलमान खान टीव्ही' च्या सर्व कर्मचार्यांना आगाऊ पगारही दिला आहे.
बाबा सिद्दीकी ट्विट
Thank you @beingsalmankhan @tweetbeinghuman for your generous contribution towards the daily wage workers. You are always one step ahead of everybody when it comes to helping people and you have proved that yet again. (1/2).. pic.twitter.com/3zlW51MKOg
— Baba Siddique (@BabaSiddique) April 10, 2020
दरम्यान, क्वारंटाईन काळात सलमान खान आपल्या पनवेल मधील फार्म हाऊस वर कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या इंस्टाग्राम वरून स्केचिंग करतानाचा, घोड्याला गवत खाऊ घालतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.