Akshay kumar (Photo Credit - File Photo)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भावामुळे जगातील अनेक देशाला अर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. भारताचीही अर्थिक परिस्थिती ढासळू लागल्याने देशात सरकारपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, कोरोनाशी लढा देण्यासाठी देशामध्ये सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे. लॉकडाऊन अनेक गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. सर्व शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था आणि दिग्गज मंडळी पुढे येऊन अशा गोरगरीबांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. यात अनेकांना कोरोना बाधितांसाठी सरकारच्या PM आणि CM सहाय्यक निधीला देखील मदत केली आहे. यातच बॉलिवूडचे सुपरस्टार अक्षय कुमारने (Akshay Kumar) मुंबई महापालिकेला (Mumbai Municipal Corporation) कोटीची मदत केली आहे. कोरोना विषाणूशी लढण्यासाठी मास्क (PPE Masks) आणि रॅपिड टेस्टिंग किटस् (Rapid Testing Kits) बनवण्यासाठी ही मदत केली आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. अक्षय कुमारच्या या कामगिरीमुळे सर्व चाहत्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

देशावर कोरोना विषाणूचे संकट वावरत आहे. कोरोना विषाणूशी लढण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूच्या लढाईत राजकीय नेते, खेळाडू, कलाकार यांच्यासह सर्वसामान्य जनतेकडूनही सरकारला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या काही दिवसांपूर्वी नागरिकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीत मदत करण्याचे आवाहन केले होते. यांच्या या आवाहनाला जनतेकडून उस्त्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हे देखील वाचा- लॉकडाऊनच्या काळात करण जोहरच्या 'या' कृत्यावर त्याची मुले यश आणि रूही ने नोंदवला आक्षेप, पाहा पोट धरुन हसायला लावणारा हा व्हायरल व्हिडिओ

ट्वीट-

जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 15 लाख 96 हजार 496 वर पोहचली आहे. यांपैकी 95 हजार 505 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 लाख 54 हजार 6 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतही आता कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 6 हजार 761 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 199 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 516 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 1380 वर पोहचली आहे. यात 72 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 117 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.