
बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) लॉकडाऊनमुळे सध्या आपल्या कुटूंबासह आपल्या घरात छान वेळ घालवताना दिसत आहे. सरोगसी द्वारा झालेला पिता करण जोहर याला यश आणि रुही असे दोन मुलं झाली. त्यानंतर त्याने आपल्या आई हिरू सह या दोन मुलांचा सांभाळ केला. नेहमी चित्रपटांच्या किंवा अन्य रिअॅलिटी शो मध्ये व्यस्त असलेला करण सध्या आपली मुले आणि आईसह छान वेळ घालवताना दिसत आहे. त्याचे अनेक व्हिडिओ तो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत आहे.
नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याची घरात बनवलेल्या टिकी आणि शेवपूरी ताव मारताना दिसत आहे. अशा वेळी करणने असे काही कृत्य केले की यश आणि रुही पप्पा असं करु नका आणि शांत बसा असे म्हणायला लागले.
पाहा हा मजेशीर व्हिडिओ:
हेदेखील वाचा- लॉकडाऊनच्या काळात कल्की कोचलिन आपल्या गोंडस मुलीसह खेळतानाचे सुंदर क्षण कॅमे-यात कैद, नक्की पाहा
या व्हिडिओमधून करण खूप बेसु-या आवाजात गात असून तुम्ही कृपया गाऊ नका अशी त्याची मुले तसेच त्याची आई सुद्धा सांगत आहे. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला आहे की, 16 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे. तसेच अनेक बॉलिवूड कलाकारांनी या पोस्टला मजेशीर कमेट्स दिले आहेत.