Bharat Movie Teaser: धर्मनिरपेक्ष भारतीयांना विचार करायला लावणार सलमान खानचा 'भारत'
Salman Khan in Bharat Movie (Photo Credit: YouTube)

Bharat Movie Teaser: सलमान खानचा नवाकोरा सिनेमा 'भारत'चा (Bharat) टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि सलमान खान (Salman Khan) ही सुपरहीट जोडी पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे. सिनेमाचे नाव 'भारत' का आहे, याचा उलघडा टीझर मधून होतो. यात सलमान नेव्ही ऑफिसरच्या भूमिकेत दिसत असला तरी त्याची वयाच्या विविध टप्प्यातील वेगवेगळी रुपं पाहायला मिळत आहेत. सलमान खानचा जबरदस्त डॅशिंग लूक सिनेमाचे आकर्षण ठरत आहे. (सलमान खान - कॅटरिना कैफ पोहचले भारत -पाकिस्तान बॉर्डरवर, सलमानने शेअर केला खास फोटो)

सलमान खान, कतरिना कैफ सोबतच या सिनेमामध्ये दिशा पटनी, तब्बू ,सुनील ग्रोवर या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिनेमात जॅकी श्रॉफ सलमान खानच्या वडिलांची भूमिकेत  दिसणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' सिनेमा 2019 च्या ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

'भारत' हा कोरियन सिनेमा An Ode to My Father याचा रिमेक आहे. An Ode to My Father या सिनेमात 1950 पासून आतापर्यंतचा देशाचा इतिहास एका व्यक्तीच्या माध्यमातून उलघडला आहे. या सिनेमावर आधारीत 'भारत' सिनेमात 1947 पासूनचा 20 व्या शतकापर्यंतचा देशाचा आणि सलमानच्या भूमिकेचा प्रवास रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.