सलमान खान - कॅटरिना कैफ पोहचले भारत -पाकिस्तान बॉर्डरवर, सलमानने शेअर केला खास फोटो
सलमान खान कैटरीना कैफ (Photo Credits: Instagram)

सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही बॉलिवूडमधील सुपरहीट जोडी पुन्हा रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. २०१९ च्या ईद ला अली अब्बास जफरच्या 'भारत'(Bharat) सिनेमातून सलमान कॅटरिना पुन्हा एकत्र येणार आहे. काही तासांपूर्वी सलमान खानच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून भारत(Bharat) सिनेमातील एका खास फोटोची झलक शेअर करण्यात आली आहे. त्यामुळे आता 'भारत'(Bharat) सिनेमाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

भारत सिनेमाची खास झलक

सलमान खान सोबत अभिनेत्री कॅटरिना कैफ प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. वाघा बॉर्डरच्या परिसरात एका गेटवर सलमान आणि कॅटरिना पाठमोरे उभे आहेत.

 

View this post on Instagram

 

@bharat_thefilm @aliabbaszafar @katrinakaif @dishapatani @whosunilgrover @atulreellife

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सलमान खान,कॅटरिना कैफ सोबतच या सिनेमामध्ये दिशा पटनी, तब्बू ,सुनील ग्रोवर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. जॅकी श्रॉफ सलमान खानच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. या सिनेमात सलमान खान वयाच्या विविध टप्प्यांवर विविध रूपात दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये 'भारत' सिनेमा बाबत खास आकर्षण आहे.